Rohit Sharma | Shubman Gill Dainik Gomantak
क्रीडा

Shubman Gill Century: गिलने शतक करताच रोहितनं केलं असं काही की फॅन्सकडूनही झालं कौतुक; पाहा Video

IPL 2023: दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सच्या शुभमन गिलने शतक केल्यानंतर रोहितच्या कृतीने अनेक चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

Pranali Kodre

Rohit Sharma's Gesture After Shubman Gill hit Century: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत दुसरा क्वालिफायर सामना गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना झाला. या सामन्यात गुजरातने 62 धावांनी विजय मिळवत अंतिम सामन्यातील प्रवेश निश्चित केला आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सचा युवा खेळाडू शुभमन गिलने शतकी खेळी केली.

गिलने 49 चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले. त्याच्या या शतकानंतर गुजरात टायटन्सच्या ड्रेसिंग रुममध्ये मोठा जल्लोष करण्यात आला. गिलने 15 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कॅमेरॉन ग्रीनविरुद्ध एकेरी धाव धावत त्याचे हे शतक पूर्ण केले.

गिलने शतक केल्यानंतर त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये उंच उडी मारून आणि नंतर कंबरेत झुकून सेलिब्रेशन केले. त्याचवेळी गुजरात टायटन्सच्या खेळाडूंसह सर्वजणांनी उभे राहत टाळ्या वाजवल्या. कर्णधार हार्दिक पंड्याही जोरदार प्रोत्साहन देताना दिसला.

पण, तरीही या सर्वात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या कृतीने सर्वांचेच लक्ष वेधले. गिलच्या शतकाबद्दल रोहितनेही त्याचे कौतुक केले. त्याने गिलशी हात मिळवत त्याचे अभिनंदन केले. गिलनेही त्याच्या शतकानंतर त्याच्या बॅटला किस केले. या क्षणांचा व्हिडिओ आयपीएलच्या सोशल मीडिया अकाउंटवरही शेअर करण्यात आला आहे.

गिलचे तिसरे शतक

गिलने या सामन्यात 60 चेंडूत 7 चौकार आणि 10 षटकारांसह 129 धावा केल्या. तो आयपीएल प्लेऑफमध्ये शतक करणारा सर्वात युवा खेळाडूही ठरला. तसेच हे त्याचे आयपीएल 2023 मधील तिसरे शतक ठरले आहे. त्याने याआधी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 101 धावांची खेळी केली होती, तसेच त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध नाबाद 104 धावांची खेळी केली होती.

गुजरातचा विजय

या सामन्यात गिलच्या शतकाच्या जोरावर 20 षटकात 3 बाद 233 धावा केल्या होत्या. त्यानंतर 234 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 18.2 षटकात सर्वबाद 171 धावाच करता आल्या.

मुंबईकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 38 चेंडूत 61 धावांची खेळी केली. तसेच तिलक वर्माने 43 आणि कॅमेरॉन ग्रीनने 30 धावांची खेळी केली. या तिघांव्यतिरिक्त मुंबईकडून कोणाला दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही. गुजरातकडून मोहित शर्माने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच राशिद खान आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Petrol Diesel Prices In Goa: लॉंग विकेंडला गोव्यात जाताय? पेट्रोल-डिझेलचे ताजे दर जाणून घ्या..

Krishna Janmashtami 2025: कराचीमध्ये भजन, बांगलादेशमध्ये मिरवणूक; 'श्रीकृष्ण जन्माष्टमी' जगभर कशी साजरी होते?

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT