Harmanpreet Kaur Dainik Gomantak
क्रीडा

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सने केली मोठी घोषणा, हरमनप्रीत कौर करणार नेतृत्व

Harmanpreet Kaur: मुंबई इंडियन्स संघ आपला पहिला सामना डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी मुंबई येथे गुजरात जायंट्सविरुद्ध खेळणार आहे.

Manish Jadhav

WPL 2023 Mumbai Indians: महिला प्रीमियर लीग 2023 4 मार्चपासून सुरु होत आहे. ही लीग सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघाने आपल्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे.

मुंबई इंडियन्स संघ आपला पहिला सामना डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी मुंबई येथे गुजरात जायंट्सविरुद्ध खेळणार आहे.

मुंबई इंडियन्सने एका भारतीय खेळाडूला आपल्या संघाचा कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला आहे. संघाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन कर्णधाराच्या नावाची घोषणा केली.

मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराची घोषणा

मुंबई इंडियन्सच्या संघाने 33 वर्षीय हरमनप्रीत कौरला (Harmanpreet Kaur) संघाची कर्णधार बनवली आहे. हरमनप्रीत कौर ही भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधारही आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मुंबई इंडियन्सने हरमनप्रीत कौरच्या कर्णधारपदी नियुक्ती जाहीर केली आहे.

13 फेब्रुवारी रोजी महिला प्रीमियर लीगसाठी खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. या लिलावात मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने 1.80 कोटी रुपये खर्च करुन हरमनप्रीत कौरचा संघात समावेश केला. हरमनप्रीत कौरची मूळ किंमत 50 लाख रुपये होती.

151 टी-20 सामने खेळण्याचा अनुभव

हरमनप्रीत कौरने भारतासाठी (India) आतापर्यंत 151 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये हरमनप्रीत कौरने 3058 धावा केल्या आहेत. यादरम्यान तिने T20 मध्ये एका शतकासह 10 अर्धशतके झळकावली आहेत.

एवढेच नाही तर आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारी ती जगातील चौथी खेळाडू आहे. हरमनप्रीत कौरने महिला टी-20 चॅलेंजमध्येही कर्णधारपद भूषवले आहे. या स्पर्धेतही तिने आपल्या संघाला चॅम्पियन बनवले.

मुंबई इंडियन्स संघाचा संघ

नताली स्कायव्हर रु. 3.2 कोटी, पूजा वस्त्राकर रु. 1.90 कोटी, हरमनप्रीत कौर रु. 1.80 कोटी, यास्तिका भाटिया रु. 1.50 कोटी, अमेलिया केर रु. 1 कोटी, अमनजोत कौर रु. 50 लाख, हेली मॅथ्यूज रु. 40 लाख, चले 30 लाख रु. 30 लाख रुपये.

इसाबेल वोंग 30 लाख रुपये, प्रियांका बाला 20 लाख रुपये, धारा गुर्जर 10 लाख, हुमैरा काझी 10 लाख, जिंतिमनी कलिता 10 लाख, नीलम बिश्त 10 लाख, सायका इशाक 10 लाख, सोनम यादव 10 लाख लाख रुपये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Elections 2027: प्लॅनिंग तयार, आता मैदानात उतरा! भाजप अध्यक्षांनी कार्यकर्त्यांना दिला 2027 च्या विजयाचा 'महामंत्र'; विधासभा निवडणुकीचं फुंकलं रणशिंग

Goa Politics: नितीन नवीन भाजपचे 'बिग बॉस', मुख्यमंत्री सांवतांकडून कौतुकाचा वर्षाव; आगामी निवडणुका जिंकण्याचा केला निर्धार

Goa Accident: झोप ठरली जीवघेणी...! ट्रक खाली झोपलेल्या अज्ञात व्यक्तीचा चिरडून मृत्यू; करासवाडा येथील घटनेनं हादरला गोवा

Seaweed Forests: गोव्याच्या किनाऱ्यावर 'समुद्री शेवाळाची जंगले' आहेत, ही जाणीव लोकांमध्ये निर्माण व्हायला हवी..

Crime News: घरातच बनवली 'स्मशानभूमी'! आई-वडिलांना मारुन मुलानं घरातच गाडलं; बहिणीच्या प्रेमप्रकरणातून संपवलं संपूर्ण कुटुंब

SCROLL FOR NEXT