Mumbai Indians: मुंबई इंडियन्सला मोठा झटका, 17.5 कोटी वाला खेळाडू जखमी; Video

Mumbai Indians Team IPL 2023: आयपीएल 2022 साठी मिनी लिलाव 23 डिसेंबर रोजी पार पडला. या लिलावात सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सनेही अनेक खेळाडूंना मोठी बोलत आपल्या संघात घेतले.
Mumbai Indians
Mumbai IndiansDainik Gomantak

Mumbai Indians Team IPL 2023: आयपीएल 2022 साठी मिनी लिलाव 23 डिसेंबर रोजी पार पडला. या लिलावात सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सनेही अनेक खेळाडूंना मोठी बोलत आपल्या संघात घेतले. 17.5 कोटी रुपयांमध्ये एका अष्टपैलू खेळाडूला आपल्या संघाचा भाग बनवले. मात्र लिलावाच्या 4 दिवसांनंतरच हा खेळाडू जखमी झाला. या खेळाडूची दुखापत ही मुंबई इंडियन्ससाठी वाईट बातमी आहे.

मुंबई इंडियन्सचा हा खेळाडू जखमी झाला

आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरुन ग्रीनला 17.5 कोटींना विकत घेतले. मात्र, मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात तो जखमी झाला. कॅमेरुन ग्रीनची ही दुखापत इतकी गंभीर होती की, त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. ऑस्ट्रेलियन मीडियानुसार, ग्रीनच्या दुखापतीचे स्कॅनिंग केले जाईल आणि त्यानंतरच त्याच्या पुढे खेळण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

Mumbai Indians
Mumbai Indians: आयपीएलमधील पराभवानंतर मुंबई इंडियन्सने उचलले कठोर पाऊल; 'या' खेळाडूंची इंग्लंड होणार रवानगी

वेगवान चेंडूमुळे जखमी

ऑस्ट्रेलियन डावात दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) वेगवान गोलंदाज एनरिक नोर्किया 85 वे षटक टाकत होता. एनरिक नोर्कियाचा वेगवान चेंडू थेट कॅमेरुन ग्रीनच्या हाताला लागला, यानंतर त्याच्या बोटातूनही रक्त येत असल्याचे दिसून आले. या दुखापतीमुळे त्याला पहिल्या सामन्यात पुढे फलंदाजीही करता आली नाही.

Mumbai Indians
IPL: Mumbai Indians च्या टिळकने मारलेला बॉल थेट कॅमेरामनला लागला

पहिल्या डावात 5 विकेट्स होत्या

या सामन्याच्या पहिल्या डावात 5 विकेट्स घेण्याचा पराक्रमही कॅमेरुन ग्रीनने केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एमसीजी येथे सुरु असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी त्याने ही अप्रतिम कामगिरी केली. ग्रीनने आफ्रिकेच्या शेवटच्या फळीतील फलंदाजांना बाद करुन 27 धावांत 5 बाद अशी कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. पाहुण्यांना पहिल्या डावात 189 धावांत गुंडाळले. डिसेंबर 2020 मध्ये आपल्या कसोटी कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या कॅमेरुन ग्रीनने आता कसोटी क्रिकेटमध्ये 23 बळी घेतले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com