Akash Madhwal
Akash Madhwal  Dainik Gomantak
क्रीडा

Akash Madhwal 5 Wickets: मधवालची भन्नाट गोलंदाजी! मुंबईसाठी 5 विकेट्स घेत केली कुंबळेच्या 14 वर्षे जुन्या विक्रमाशीही बरोबरी

Pranali Kodre

Akash Madhwal 5 Wickets: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने बुधवारी एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सला 81 धावांनी पराभूत केले. यासह मुंबईने आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात प्रवेश केला आहे. मुंबईच्या या विजयात आकाश मधवालने महत्त्वाचा वाटा उचलला.

या सामन्यात मुंबई इंडियन्सने 183 धावांचे आव्हान लखनऊसमोर ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊला 16.3 षटकात सर्वबाद 101 धावाच करता आल्या. मुंबईकडून मधवालने 3.3 षटके गोलंदाजी करताना 5 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.

त्याने प्रेरक मंडक, आयुष बदोनी, निकोलस पूरन, रवी बिश्नोई आणि मोहसीन खान यांनी विकेट्स घेतल्या. त्यामुळे तो आयपीएलमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा अनकॅप खेळाडू (आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेला) ठरला आहे.

यापूर्वी हा विक्रम अंकित राजपूतच्यानावावर होता. त्याने 2018 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबकडून सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 14 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या.

आयपीएलमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे अनकॅप खेळाडू

  • 5/5 - आकाश मधवाल (मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, चेन्नई, 2023)

  • 5/14 - अंकित राजपूत (किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, हैदराबाद, 2018)

  • 5/20 - वरुण चक्रवर्ती (कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, अबुधाबी, 2020)

  • 5/25 - उमरान मलिक (सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स, मुंबई, 2022)

अनिल कुंबळेची बरोबरी

आकाश मधवालची बुधवारी केलेली कामगिरी ही आयपीएलमधील चौथे सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन ठरले आहे. त्याने अनिल कुंबळेची बरोबरी केली आहे. कुंबळेनेही रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून 2009 मध्ये केपटाऊनमध्ये झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात 5 धावांत 5 विकेट्स घेतल्या होत्या.

या यादीत अव्वल क्रमांकावर अल्झारी जोसेफ आहे. त्याने 2019 मध्ये मुंबई इंडियन्सकडून सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 12 धावात 6 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सोहेल तन्वीरने राजस्थान रॉयल्सकडून चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 2008 मध्ये 14 धावांत 6 विकेट्स घेतल्या होत्या.

ऍडम झम्पा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 2016 मध्ये 19 धावांत 6 विकेट्स घेतल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT