Harmanpreet Kaur  X/wplt20
क्रीडा

WPL 2024, MI vs GG: कर्णधार हरमनप्रीतचा विजयी षटकार, मुंबईने जिंकला सलग दुसरा सामना; अष्टपैलू एमेलियाही चमकली

Gujarat Giants vs Mumbai Indians: वुमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने रविवारी गुजरात जायंट्सला पराभूत करत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.

Pranali Kodre

Mumbai Indian won by 5 Wickets against Gujarat Giants in WPL 2024 match:

वुमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील तिसरा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स संघात रविवारी (25 फेब्रुवारी) पार पडला. बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने 5 विकेट्सने विजय मिळवला. मुंबईचा हा सलग दुसरा विजय ठरला.

या सामन्यात गुजरातने मुंबईसमोर 127 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग मुंबईने 18.1 षटकात 5 विकेट्स गमावत 129 धावा करत सहज पूर्ण केला. मुंबईकडून हरमनप्रीत कौरने विजयी षटकार ठोकला.

गुजरातने दिलेल्या 127 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने सलामीला फलंदाजीला आलेल्या यास्तिका भाटीया (7) आणि हेली मॅथ्युज (7) यांच्या विकेट्स स्वस्तात गमावल्या होत्या. परंतु, नंतर नतालिया सायव्हर-ब्रंट आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी मुंबईचा डाव सावरला. परंतु, खेळापट्टीवर स्थिरावलेली नतालिया 22 धावांवर धावबाद झाली.

मात्र, याचा परिणार हरमनप्रीतने खेळावर होऊ दिला नाही. तिला एमेलिया केरची चांगली साथ मिळाली. या दोघींनी 56 धावांची अर्धशतकी भागीदारी केली.

पण मुंबई विजयापासून अवघ्या 12 धावा दूर असताना एमेलिया 31 धावा करून बाद झाली. पाठोपाठ पुजा वस्त्राकरही 1 धावेवर माघारी परतली, त्यामुळे मुंबईला मोठे धक्के बसले होते. परंतु कर्णधार हरमनप्रीतने खेळपट्टीवर टिकून राहत मुंबईला विजयापर्यंत पोहचवले. हरमनप्रीत 46 धावांवर नाबाद राहिली.

गुजरातकडून तनुजा कन्वरने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच कॅथरिन ब्रायस आणि ली तुहुहू यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, मुंबईची कर्णधार हरमनप्रीतने नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. या निर्णय मुंबईच्या गोलंदाजांनी सुरुवातीलाच योग्यही ठरवला.

शबनीम इस्माईलने वेदा कृष्णमुर्तीला शुन्यावरच बाद केले, तर हरलिन देओलला 8 धावांवर बाद केले. यानंतर नतालिया सायव्हर-ब्रंटने फोबी लिचफिल्डचा (7) अडथळा दूर केला, तर दयालन हेमलताला हेली मॅथ्यूजने 3 धावांवरच बाद केले.

दरम्यान, या विकेट जात असताना गुजरातची कर्णधार बेथ मुनीने एक बाजू सांभाळली होती. मात्र अखेर तिलाही ११ व्या षटकात शबनीमने बाद करत गुजरातला मोठा धक्का दिला. मुनीने 24 धावा केल्या. एकवेळ गुजरात संघ 58 धावांवर 5 विकेट्स अशा स्थितीत होता.

त्यानंतरही एमेलिया केरने गुजरातची मधली आणि तळातली फलंदाजी धोकादायक ठरणार नाही, याची काळजी घेतली.

परंतु नंतर गुजरातकडून ऍश्ले गार्डनर (15), कॅथरिन ब्रायस (25) आणि तनुजा कन्वर (28) यांनी छोटेखानी खेळी करत गुजरातला समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहचवले. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 126 धावा केल्या.

मुंबईकडून गोलंदाजी करताना एमेलिया केरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच शबनीम इस्माईलने 3 विकेट्स घेतल्या, तर नतालिया सायव्हर-ब्रंट आणि हेली मॅथ्युजने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: तिस्क-उसगाव येथे मध्यरात्री दुचाकीचा भीषण अपघात

Old Goa Helipad: गोव्यात हेलिपॅडवरुन केवळ 55 यशस्वी उड्डाणे! खर्च मात्र कोटीत; 'बॅट' बेटाचा पर्याय पुढे

Goa Crime: टॅक्सीचालकाने केले अल्पवयीन मुलीशी लग्न; घरी गेल्यावर उलगडला खरा प्रकार, कर्नाटकातील तरुणाच्या आवळल्या मुसक्या

Junta House Panaji: 'जुन्ता हाऊस' धोकादायकच, स्ट्रक्चरल ऑडिट कशासाठी? चोडणकरांचा सवाल

'ही धूळफेक ठरू नये...'; निवड आयोगाकडून भरतीच्या निर्णयावर चोडणकर, बोरकरांनी सुनावले खडे बोल

SCROLL FOR NEXT