Mumbai City FC

 

Dainik Gomantak 

क्रीडा

Indian Super League: राहुल भेकेचा गोल मुंबई सिटीसाठी ठरला निर्णायक

मुंबई सिटी एफसीने इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमातील घोडदौड कायम राखताना अग्रस्थानही भक्कम केले.

किशोर पेटकर

पणजी: सामना संपण्यास चार मिनिटे बाकी असताना राहुल भेके याने केलेल्या गोलमुळे गतविजेत्या मुंबई सिटी एफसीने इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमातील घोडदौड कायम राखताना अग्रस्थानही भक्कम केले. त्यांनी बुधवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर माजी विजेत्या चेन्नईयीन एफसीला (Chennaiyin FC) 1-0 फरकाने निसटते हरविले.

मुंबई सिटीकडून हार स्वीकारल्याने आठव्या मोसमातील अपराजित संघ ही चेन्नईयीनची ओळख पुसली गेली. त्यांचा हा पाच लढतीतील पहिलाच पराभव ठरला. बचावफळी आणि गोलरक्षक विशाल कैथ याने सामन्यात दक्ष राहत मुंबई सिटीची आक्रमणे वेळोवेळी फोल ठरविली, पण 86व्या मिनिटास त्यांचा बचाव प्रतिस्पर्ध्यांच्या प्रभावी सेटपिसवर कोलमडला आणि मुंबई सिटीचे फावले. अहमद जाहू याचा फ्रीकिक फटका रोखण्याच्या उद्देशाने कैथ याने जागा सोडली आणि ही नेमकी राहुलने साधली. शानदार हेडिंगवर या बचावपटूने गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. त्याचा हा यंदाच्या सहा सामन्यातील पहिला, तर एकंदरीत 98 आयएसएल सामन्यातील सहावा गोल ठरला. या विजयासह आता मुंबई सिटीचे अग्रस्थान मजबूत झाले आहे. त्यांनी जवळचा प्रतिस्पर्धी जमशेदपूर एफसीवर (Jamshedpur FC) चार गुणांची आघाडी घेतली आहे. डेस बकिंगहॅम यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचा हा सहा सामन्यातील पाचवा विजय ठरला. त्यांचे आता सर्वाधिक 15 गुण झाले आहेत. बोझिदार बँडोविच यांच्या मार्गदर्शनाखालील चेन्नईयीन एफसीला पहिल्या पराभवामुळे पाचव्या स्थानी कायम राहावे लागले. त्यांच्या खाती पाच लढतीनंतर आठ गुण राहिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT