ISL Football: मुंबई सिटीचे अग्रस्थान अबाधित Dainik Gomantak
क्रीडा

ISL Football: मुंबई सिटीचे अग्रस्थान अबाधित

आयएसएल फुटबॉल स्पर्धेत जमशेदपूरला 4-2 फरकाने हरविले

दैनिक गोमन्तक

पणजी: मुंबई सिटी (Mumbai City) एफसीने इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमातील अग्रस्थान अबाधित राखताना जमशेदपूर एफसीची (Jamshedpur FC) अपराजित मालिका खंडित केली. गतविजेत्यांनी गुरुवारी 4-2 फरकाने विजय नोंदवत गुणसंख्या बारावर नेली. सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला.

मुंबई सिटीने सामन्यातील अर्ध्या तासापूर्वीच तीन गोलची भक्कम आघाडी मिळविली. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटास ब्राझीलियन कॅसियो गॅब्रिएल याने आयएसएल स्पर्धेतील पहिला गोल केला. नंतर 17व्या मिनिटास बिपिन सिंगने, तर 24व्या मिनिटास स्पॅनिश इगोर आंगुलो याने गोल केल्यामुळे मुंबई सिटीची स्थिती बळकट झाली. नंतरचे दोन्ही गोल कॅसियोच्या असिस्टवर झाले. आंगुलोने यंदाच्या स्पर्धेतील वैयक्तिक गोलसंख्या पाचवर नेत गोल्डन बूटच्या शर्यतीत अग्रस्थान मिळविले. बिपिनने यंदाच्या स्पर्धेतील दुसरा गोल केला.

विश्रांतीनंतरच्या खेळातील दहा मिनिटांत दोन गोल नोंदवून जमशेदपूरने पिछाडी 2-3 अशी कमी केली. कोमल थाटल याने 48व्या मिनिटास गोल केल्यानंतर ब्राझीलियन एली साबिया याने 55व्या मिनिटास रिबाऊंडवर शानदार हेडिंग साधत प्रतिस्पर्धी गोलरक्षक महंमद नवाझ याचा संधी दिली नाही. मात्र 70व्या मिनिटास बदली खेळाडू ब्राझीलियन य्गोर कातातौ याने जमशेदपूरच्या भरकटलेल्या बचावाचा लाभ उठवत मुंबई सिटीची आघाडी 4-2 अशी पुन्हा वाढविली. 68व्या मिनिटास आंगुलोची जागा घेतलेल्या कातातौ याचा हा यंदाच्या स्पर्धेतील तिसरा गोल ठरला.

डेस बकिंगहॅम यांच्या मार्गदर्शनाखालील मुंबई सिटीचा हा सलग तिसरा, तर एकंदरीत चौथा विजय ठरला. त्यांनी दुसऱ्या स्थानावरील जमशेदपूरवर चार गुणांची आघाडी घेतली आहे. ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखालील जमशेदपूरला अगोदर प्रत्येकी दोन विजय व बरोबरी नोंदविल्यानंतर स्पर्धेत प्रथमच पराभवास सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांचे आठ गुण कायम राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Photo Contest: गोव्यातील नदी, डोंगर, निसर्गसौंदर्याचा फोटो काढा आणि 20 हजार रुपये जिंका; कसा घ्यायचा सहभाग, वाचा सविस्तर

Vice President Election Result: सी पी राधाकृष्णन बनले भारताचे 15वे उपराष्ट्रपती, एनडीएने जिंकली निवडणूक!

Balendra Shah: रॅपर ते लोकप्रिय राजकारणी... नेपाळच्या तरुणाईचा 'हिरो' आता पंतप्रधानपदाचा दावेदार, काठमांडूचे महापौर बालेन्द्र शाह चर्चेत

Sawantwadi Gambling Raid: सिंधुदुर्ग पोलीस ॲक्शन मोडवर सावंतवाडीतील 4 मटका-जुगार अड्ड्यांवर धाड; 8 जणांवर कारवाई

Nepal President Resigned: पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यानंतर राम चंद्र पौडेल यांनी दिला राष्ट्रपती पदाचा राजीनामा; नेपाळमध्ये मोठा राजकीय भूकंप!

SCROLL FOR NEXT