Afghanistan Cricket Team 
क्रीडा

AFG vs ENG: मोठ्या मनाचा मुजीब...! पहिला विजय भूकंपग्रस्तांना समर्पित, तर रडणाऱ्या छोट्या फॅनलाही केलं खूश

Mujeeb Ur Rahman: इंग्लंडविरुद्धच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या अफगाणिस्तानच्या मुजीब उर रेहमानने सामन्यानंतर केलेल्या कृतीने अनेकांचे मन जिंकले आहे.

Pranali Kodre

Mujeeb Ur Rahman dedicates Afghanistan win against England in ICC ODI Cricket World Cup 2023 to earthquake victims :

वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये रविवारी धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. रविवारी अफगाणिस्तानने गतविजेत्या इंग्लंड संघाला 69 धावांनी पराभवाचा धक्का दिला. हा अफगाणिस्तानचा यंदाच्या स्पर्धेतील पहिला विजय होता.

22 वर्षीय मुजीब उर रेहमानने अफगाणिस्तानच्या या विजयात मोलाचा वाटा उचलला, पण त्यानंतर त्याने दिलेल्या प्रतिक्रियेने अनेकांची मनं जिंकली आहेत.

दिल्लीत झालेल्या या सामन्यात मुजीबने आधी फलंदाजी करताना 16 चेंडूत 28 धावा केल्या, तसेच त्याने गोलंदाजी करताना 10 षटकात 51 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्कारही देण्यात आला. दरम्यान, त्याने यानंतर आपल्या संघाचा विजय अफगाणिस्तानमधील भूकंपग्रस्तांना समर्पित केले आहे.

रविवारी अफगाणिस्तानला 6.3 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला होता. याच्या आठवडाभव आधीही अफगाणिस्तानला भूकंपाचे तीव्र झटके बसले आहेत, ज्यात हजारो लोकांनी प्राण गमावले आहेत.

याबद्दल मुजीब म्हणाला, 'हा विजय मायदेशातील लोकांसाठी आहे, जे भूकंपाने प्रभावित झाले आहेत. मी एक खेळाडू म्हणून आणि आमचा संघाकडून माझा सामनावीर पुरस्कार भूकंपग्रस्तांना समर्पित करतो.'

तसेच विजयाबद्दल मुजीब म्हणाला, 'गतविजेत्यांना वर्ल्डकपमध्ये पराभूत करणे, हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. आमच्या संपूर्ण देशासाठी आणि संघासाठी हा आनंदाचा क्षण आहे. आमच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी शानदार कामगिरी बजावली.'

छोट्या चाहत्यानेही वेधलं लक्ष

दरम्यान, अफगाणिस्तान संघ जिंकल्यानंतर एक छोटा चाहता आनंदाने रडताना दिसला होता. त्यानंतर त्याला मुजीब समजावताना दिसला होता, तसेच त्याने मुजीबला मिठी मारल्याचेही दिसले होते. हा गोड क्षण कॅमेऱ्यातही कैद झाला. त्यामुळे त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते.

अफगाणिस्तानचा विजय

या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताान 49.5 षटकात सर्वबाद 284 धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानकडून रेहमनुल्लाह गुरबाजने सर्वाधिक 80 धावांची खेळी केली. तसेच इक्रम अलीखिलने 58 धावांची खेळी केली.

इंग्लंडकडून आदिल राशिदने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच मार्क वूडने 2 विकेट्स घेतल्या. याबरोबरच रिस टोपली, लियाम लिव्हिंगस्टोन आणि जो रुट यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्यानंतर इंग्लंडचा संघ अफगाणिस्तानने दिलेल्या 285 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 40.3 षटकात 215 धावांत सर्वबाद झाला. इंग्लंडकडून एकट्या हॅरी ब्रुकने 66 धावांची झुंज दिली.

अफगाणिस्तानकडून मुजीब उर रेहमानव्यतिरिक्त राशिद खाननेही 3 विकेट्स घेतल्या. तसेच मोदम्मद नबीने 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर फझलहक फारूकी आणि नवीन उल हक यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT