Muhammad Waseem 100 International Sixes Dainik Gomantak
क्रीडा

मोहम्मद वसीमने केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड, ठोकले षटकारांचे 'शतक'; हिटमॅनला सोडले मागे

Manish Jadhav

Muhammad Waseem 100 International Sixes: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा षटकारांशी संबंधित एखादा विक्रम किंवा विश्वविक्रम समोर येतो तेव्हा प्रत्येकाच्या ओठावर लगेच रोहित शर्मा, ख्रिस गेल आणि शाहिद आफ्रिदीचे नाव येते, पण 2023 चा खरा सिक्सर किंग कोण आहे, ज्याने संपूर्ण क्रिकेट जगताला खिळवून ठेवले आहे. त्याने आपल्या नावावर नवा रेकॉर्ड नोंदवला. आजपर्यंत एकाही खेळाडूला एका वर्षात षटकारांचे शतक झळकावता आलेले नाही, परंतु 2023 मध्ये संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE च्या एका खेळाडूने असे केले आणि रोहित शर्माला मागे सोडले.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम आता UAE क्रिकेट संघाचा कर्णधार मोहम्मद वसीमच्या नावावर नोंदवला गेला आहे. एवढेच नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात 100 किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा मोहम्मद वसीम हा जगातील एकमेव खेळाडू आहे. रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या स्थानावर आहे, पण त्याने कधीही कॅलेंडर सीझनमध्ये 80 किंवा त्याहून अधिक षटकार मारलेले नाहीत. यामध्ये सूर्यकुमार यादव याचाही समावेश आहे.

दुसरीकडे, मोहम्मद वसीमने 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 101 षटकार ठोकले आहेत. त्याचवेळी, रोहित शर्माने या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 80 षटकार ठोकले आहेत. वसीमने फक्त एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेट खेळले आहे, तर रोहित शर्माने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले आहे. यावर्षी तो एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. रोहितने 2019 मध्ये 78 आणि 2018 मध्ये 74 षटकार मारले होते. तर, सूर्यकुमार यादवने 2022 मध्ये 74 षटकार मारले होते. रोहितने 2017 मध्ये 65 षटकार मारले होते.

एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू

101 षटकार - मोहम्मद वसीम (2023 मध्ये यूएईसाठी)

80 षटकार - रोहित शर्मा (भारतासाठी 2023)

78 षटकार - रोहित शर्मा (भारतासाठी 2019)

74 षटकार - रोहित शर्मा (भारतासाठी 2018)

74 षटकार - सूर्यकुमार यादव (भारतासाठी 2022)

65 षटकार - रोहित शर्मा (भारतासाठी 2017)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

SCROLL FOR NEXT