MS Dhoni  Dainik Gomantak
क्रीडा

MS Dhoni सह 'या' 5 खेळाडूंना लागली लॉटरी, एमसीसीने 'आजीवन सदस्यत्व' केले बहाल

Marylebone Cricket Club: महेंद्रसिंग धोनीची गणना जगातील सर्वोत्तम फिनिशरमध्ये केली जाते.

Manish Jadhav

Marylebone Cricket Club: महेंद्रसिंग धोनीची गणना जगातील सर्वोत्तम फिनिशरमध्ये केली जाते. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने T20 विश्वचषक 2007, एकदिवसीय विश्वचषक 2011 आणि ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 जिंकली.

आता मेरीलेबोन क्रिकेट क्लबने धोनी, युवराज सिंग, सुरेश रैना, मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांना मोठ्या सन्मानाने सन्मानित केले आहे. त्याबद्दल जाणून घेऊया...

या खेळाडूंना मोठा मान मिळाला

प्रतिष्ठित मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (MCC) बुधवारी विश्वचषक विजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि अन्य चार भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना 'आजीवन सदस्यत्व' बहाल केले आहे.

या खेळाडूंमध्ये युवराज सिंग, सुरेश रैना (Suresh Raina), माजी भारतीय महिला कर्णधार मिताली राज आणि महान महिला गोलंदाज झुलन गोस्वामी यांचा समावेश आहे.

MCC ने आठ कसोटी खेळणार्‍या देशांमधील 19 नवीन आजीवन सदस्यांची नावे जाहीर केली. एमसीसीने आपल्या वेबसाइटवर सांगितले की, पाच भारतीय खेळाडूंना आजीवन सदस्यत्व देण्यात आले आहे. झुलन ही महिला वनडेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज आहे, तर मितालीने 211 डावांमध्ये 7,805 धावा केल्या आहेत.

भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता

मेरीलेबोन क्रिकेट क्लबच्या वेबसाइटवर असे म्हटले आहे की, MS धोनी आणि युवराज सिंग हे दोघेही 2007 ICC T20 विश्वचषक आणि 2011 ICC ODI विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे अविभाज्य भाग होते.

सुरेश रैनाने 13 वर्षांच्या कारकिर्दीत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5,500 हून अधिक धावा केल्या आहेत.

एकदिवसीय विश्वचषक 2011 च्या अंतिम सामन्यात धोनीने 91 धावांची तुफानी खेळी केली होती. त्याच्यामुळेच भारतीय संघ जेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला.

या खेळाडूंना संधी

एमसीसीचे सदस्यत्व मिळालेल्या इतर क्रिकेटपटूंचा समावेश आहे, वेस्ट इंडिजचा मेरिसा अगुइला, इंग्लंडचा जेनी गन, लॉरा मार्श, अन्या श्रबसोल आणि इऑन मॉर्गन आणि केविन पीटरसन, पाकिस्तानचा मोहम्मद हाफीज, बांगलादेशचा मशरफी मोर्तझा, दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) डेल स्टेन ऑस्ट्रेलियाचा रॅचेल हेन्स आणि न्यूझीलंडचा एम. सॅटरथवेट आणि रॉस टेलर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT