MS Dhoni | Team India 
क्रीडा

MS Dhoni: टीम इंडिया वर्ल्डकप जिंकणार? धोनी म्हणतोय, 'समजदार को इशारा काफी...'

Team India in World Cup: धोनीने वर्ल्डकप 2023 मधील भारतीय संघाबद्दल भाष्य केले आहे.

Pranali Kodre

MS Dhoni reacted on Team India Performance in ICC ODI Cricket World Cup 2023:

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी कोणत्या ना कोणत्या कारणाने सातत्याने चर्चेत येत असतो. नुकतेच त्याने काही प्रमोशनल कार्यक्रमांना हजेरी लावली होती. या दरम्यान, त्याने केलेली भाष्य सध्या बरीच चर्चेत आहेत. तसेच त्याचे अनेक व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.

अशाच बंगळुरूमधील एका कार्यक्रमादरम्यानचा त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात त्याला मुलाखतकर्त्यांनी सध्या सुरू असलेल्या वनडे वर्ल्डकप 2023 भारतीय संघ जिंकेल का अशा अर्थाचा प्रश्न विचारला. त्यावर धोनीने भन्नाट उत्तर दिले.

तो म्हणाला, 'आपला संघ चांगला आहे. संघाचा समतोलही खूप चांगला आहे आणि प्रत्येकजण चांगला खेळत आहे. सर्वकाही खूप चांगले वाटत आहे. पण मला काहीही बोलून अपशकून करायचा नाही. यापेक्षा मी अजून काही जास्त बोलणार नाही. बाकी हुशार लोकांसाठी इशारच खूप आहे (समझदार को इशारा काफी).'

त्याचबरोबर या कार्यक्रमात धोनीने असेही सांगितले की त्याला लोकांनी चांगला व्यक्ती म्हणून लक्षात ठेवावे असे वाटत होते.

तो म्हणाला, 'अगदी सुरुवातीपासून मला असे वाटत नव्हते की लोकांनी मला फक्त चांगला क्रिकेटपटू म्हणून लक्षात ठेवावे, तर मी नेहमीच म्हणत आलो की लोकांनी मला एक चांगला व्यक्ती म्हणून लक्षात ठेवायला हवे. जर तुम्हाला चांगला व्यक्ती बनायचे असेल, तर ती प्रक्रिया शेवटच्या श्वासापर्यंत सुरू असते.'

त्याचबरोबर त्याने असेही सांगितले की निकालापेक्षा कोणत्याही ध्येयाची प्रक्रिया जास्त महत्त्वाची असते.

ज्यांना पिवळा रंग आवडतो, ते...

असाच धोनीचा आणखी एक वाक्य सध्या व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमात त्याला निळा आणि पिवळा रंग याबाबत विचारण्यात आले होते. निळा हा भारतीय संघाच्या जर्सीचा आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या जर्सीचा रंग आहे, तर पिवळा हा धोनी आयपीएलमध्ये कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्सच्या जर्सीचा रंग आहे.

दरम्यान त्याला या दोन रंगामधील एक रंग निवडण्यास सांगण्यात आले, त्यावर धोनीने उत्तर दिले की 'मी निळा रंग निवडेल, कारण मला माहित आहे की ज्यांना पिवळा रंग आवडतो, ते कधीही निळ्या रंगावर प्रश्न उपस्थित करणार नाहीत.'

तथापि, धोनीने अद्याप याबद्दल स्पष्ट खुलासा केलेला नाही की तो आयपीएल 2024 मध्ये खेळणार की नाही. पण त्याने आयपीएल 2023 संपल्यानंतर तो पुढीलवर्षीही खेळू शकतो याचे संकेत दिले होते, त्यामुळे चाहत्यांना अपेक्षा असेल की धोनी आयपीएल 2024 मध्येही खेळताना दिसेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT