MS Dhoni fined by Ranchi Traffic Police Dainik Gomantak
क्रीडा

MS Dhoni: आयपीएलपूर्वी कॅप्टन कूल अडचणीत! धोनीवर रांची पोलिसांची कारवाई! नेमकं प्रकरण काय? वाचा

MS Dhoni fined by Ranchi Traffic Police: महेंद्रसिंग धोनीला आपल्या शहरात, म्हणजेच रांचीमध्ये ट्रॅफिक दंड भरावा लागला आहे.

Sameer Amunekar

रांची: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक असलेल्या महेंद्रसिंग धोनीला आपल्या शहरात, म्हणजेच रांचीमध्ये ट्रॅफिक दंड भरावा लागला आहे. वेगाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी रांची ट्रॅफिक पोलिसांनी धोनीच्या नावे ई-चलन जारी केले आहे. आयपीएल २०२६ चा हंगाम तोंडावर असताना घडलेल्या या प्रकारामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, धोनी आपली गाडी मर्यादेपेक्षा जास्त वेगाने चालवत असल्याचे निदर्शनास आले. यावरून रांची पोलिसांनी मोटार वाहन कायद्याच्या कलम १८३ अंतर्गत त्याच्यावर कारवाई केली आहे.

धोनीला गाड्यांची प्रचंड आवड आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. अनेकदा तो रांचीच्या रस्त्यांवर आपल्या दुर्मिळ बाईक्स किंवा कार चालवताना दिसतो. मात्र, यावेळी वेगावर नियंत्रण न राहिल्याने त्याला या कारवाईचा सामना करावा लागला आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच झारखंड गृहनिर्माण मंडळाने एका निवासी भूखंडाच्या वापराबाबतही धोनीला नोटीस बजावली होती, त्यानंतर आता हा दुसरा झटका बसला आहे.

आयपीएल २०२६ ची तयारी आणि सीएसकेचा सराव

एकीकडे हे वादाचे ढग असले, तरी धोनीचे पूर्ण लक्ष आगामी आयपीएल हंगामावर आहे. २८ मार्चपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी तो चेन्नई येथील 'चेन्नई सुपर किंग्स'च्या सराव शिबिरात दाखल झाला आहे. नेट प्रॅक्टिसमध्ये धोनी जोरदार फटकेबाजी करत असून, वयाच्या या टप्प्यावरही त्याचा उत्साह कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. सीएसकेने त्याला ४ कोटी रुपयांच्या अनकॅप्ड श्रेणीत रिटेन केले असून, ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली संघ सहाव्या जेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे.

संघात मोठे बदल

यंदाच्या हंगामात चेन्नईच्या संघात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. राजस्थान रॉयल्समधून संजू सॅमसनला रवींद्र जडेजाच्या बदल्यात ट्रेड करून संघात सामील करण्यात आले आहे, तर सरफराज खानसारखे युवा खेळाडूही संघात आहेत. धोनीची एक झलक पाहण्यासाठी चेन्नईच्या मैदानावर चाहत्यांची मोठी गर्दी होत आहे. ट्रॅफिक दंडाची ही बातमी जरी चर्चेत असली, तरी चाहत्यांना मात्र धोनीच्या बॅटमधून निघणाऱ्या हेलिकॉप्टर शॉटचीच प्रतीक्षा लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT