MS Dhoni| Pandit Avtar 
क्रीडा

MS Dhoni चा पंडित अवतार सोशल मीडियावर व्हायरल

MS Dhoni Pandit Avtar: महेंद्रसिंह धोनी आगामी आयपीएलमध्येही दिसणार असून सध्या तो जाहिरातींमध्ये झळकत असतो.

दैनिक गोमन्तक

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. त्यानंतर आता तो केवळ आयपीएल खेळतो आहे. याशिवाय तो जाहिरातींमध्ये देखील झळकताना दिसत आहे. आयपीएलच्या हंगामासाठी देखील त्याने अगदी हटके जाहिराती केल्या होत्या. त्यानंतर आता पुढील जाहिरातीमध्ये धोनी (MS Dhoni) पंडितच्या लूकमध्ये दिसून येत आहे. त्याच्या या लूकची चर्चा सोशल मीडियावर जोरदार होत असून त्याचे फोटोही व्हायरल होत आहेत.

माही अनेक जाहिरातीमध्ये झळकतो. नुकतेच त्याने एका जाहिरातीसाठी पंडिताची वेशभूषा घेतल्याचं दिसून आले आहे. त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याचा हा लूक सोशल मीडियावर शेअर देखील केला आहे. यामध्ये धोनी एका पिवळ्या रंगाचा कुर्ता घातल्याचं दिसून येत आहे. तसंत धोनीच्या हातात एक माळ देखील दिसत आहे.

धोनी आयपीएल 2023 साठी सज्ज

2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला (Cricket) अलविदा करणारा एमएस धोनी आता फक्त आयपीएलमध्ये दिसत आहे. तो इंडियन प्रीमियर लीगमधील चेन्नई सुपर किंग्जचा एक भाग आहे. जिथे त्याला फ्रँचायझीनं 12 कोटी रुपयांमध्ये संघात कायम ठेवला आहे. धोनी 2022 मध्येही सीएसकेकडून खेळला होता आणि 2023 मध्येही खेळताना दिसणार आहे. धोनीने आयपीएलच्या (IPL) पंधराव्या हंगामापूर्वी रवींद्र जडेजाकडं कर्णधारपद सोपवलं होतं, पण नंतर त्यालाच कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडावी लागली होती.

धोनीला गुडघ्याची दुखापत त्रस्त

महेंद्रसिंह धोनी गुडघ्याच्या दुखापतीनं त्रस्त असल्याची माहिती अनेक दिवसांपासून समोर येत आहे. रांचीजवळील एका गावात झाडाखाली बसून डॉक्टरांकडून गुडघ्यांवर उपचार करत असल्याचंही समोर आलं होतं. जंगली औषधी वनस्पतींच्या मदतीनं उपचार करणाऱ्या वैद्य बंधनसिंग खरवार यांनी सांगितले होतं की, प्रत्येक रुग्णाप्रमाणे तेही धोनीकडून औषधाच्या एका डोससाठी 40 रुपये घेतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yusuf Pathan Post Controversy: 'आदिनाथ मंदिर की आदिना मशीद'? युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा आक्षेप; सोशल मीडियावर फुटले नव्या वादाला तोंड

Viral Video: पाण्याच्या बाटलीवरून 'महाभारत'! निजामुद्दीन स्टेशनवर विक्रेत्यांमध्ये तुफान हाणामारी; रेल्वेनं ठोठावला 5 लाखांचा दंड

Virat Kohli: किंग कोहलीला दिसला वर्ल्ड कप फायनलचा 'फ्लॅशबॅक'; ऑस्ट्रेलियात सरावादरम्यान चाहत्यांची धडधड वाढली, पाहा VIDEO!

Uttar Pradesh Crime: 'राजकारण करण्यासाठी येऊ नका'; राहुल गांधींच्या भेटीपूर्वीचा रायबरेली लिचिंग पीडित कुटुंबाचा VIDEO व्हायरल

Surya Gochar Horoscope: सूर्य तूळ राशीत! 'या' 3 राशींच्या करिअर आणि आर्थिक आयुष्यात मोठे बदल; राहा सावध

SCROLL FOR NEXT