MS Dhoni At JSCA International Stadium Ranchi  Dainik Gomantak
क्रीडा

MS Dhoni: धोनी...धोनी...! 'लोकल बॉय'ची झलक पाहून चाहते दंग; कॅप्टनकूलकडूनही मिळाला प्रतिसाद; Video

Video: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात रांचीमध्ये झालेला पहिला टी20 सामना पाहाण्यासाठी धोनी स्टेडियममध्ये उपस्थित होता.

Pranali Kodre

India vs New Zealand, 1st T20I: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी झाला. हा सामना रांचीतील झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (जेएससीए स्टेडियम) झाला. हा सामना पाहाण्यासाठी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी देखील उपस्थित होता.

धोनी मुळचा रांचीचाच आहे. त्यामुळे आपल्याच शहरात झालेल्या हा सामना पाहाण्यासाठी धोनी स्टेडियममध्ये आला होता. त्याच्यासह त्याची पत्नी साक्षी देखील उपस्थित होते. त्यांचा सामना पाहातानाचा व्हिडिओही बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

धोनीची रांचीतील लोकप्रियता कमालीची आहे, हेच या व्हिडिओतूनही दिसले. ज्यावेळी धोनीला स्क्रिनवर दाखवण्यात आले, त्यावेळी प्रेक्षकांनी त्याच्या नावाने आंनदाने नारेही दिले. धोनीनेही चाहत्यांच्या प्रेमाला प्रतिसाद देत हात हलवला. विशेष म्हणजे जेएससीए स्टेडियममध्ये धोनीच्या नावाने स्टँडही आहे.

(MS Dhoni came to watch India vs New Zealand 1st T20I match at JSCA International Stadium Complex, Ranchi)

धोनीने या सामन्यापूर्वी देखील भारतीय संघातील खेळाडूंची भेट घेतली होती. तो भारतीय खेळाडूंना भेटण्यासाठी ड्रेसिंग रुममध्ये आला होता. त्याचा व्हिडिओही बीसीसीआयने शेअर केला होता.

धोनीला भेटण्याबद्दल भारताचा कर्णधार हार्दिक पंड्याने सांगितले की 'माही भाई इथे आहे, ही चांगली गोष्ट आहे. कारण आम्ही त्याला भेटू शकलो आणि आम्ही त्याला भेटण्यासाठी आम्ही हॉटेलमधूनही बाहेर पडू शकलो.'

'नाहीतर, गेल्या एक महिन्यात आम्ही खेळलो, तेव्हा हॉटेलबाहेर गेलो नव्हतो. जेव्हाही आम्ही भेटतो, तेव्हा खेळाऐवजी आयुष्याबद्दल चर्चा करतो. आम्ही जेव्हा एकत्र खेळलो होतो, तेव्हा मी त्याच्याकडून खूप शिकलो आहे. त्याच्याकडून मी जवळपास बरेच ज्ञान घेतले आहे, आता फार काही शिल्लक नाही.'

दरम्यान, हार्दिक धोनीला या सामन्यापूर्वी त्याच्या घरीही भेटला होता. त्यांच्या भेटीदरम्यानचा फोटोही हार्दिकने शेअर केला होता. या फोटोमध्ये धोनी आणि हार्दिक विंटेज बाईकवर बसले असल्याचे दिसले होते. त्यावर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रियाही आल्या होत्या.

धोनी भारताचा यशस्वी कर्णधार

धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 15 ऑगस्ट 2020 रोजी निवृत्ती घेतली आहे. दरम्यान, तो भारताचा यशस्वी कर्णधार आणि यष्टीरक्षक म्हणून ओळखला जातो.

कॅप्टनकूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली भारताला 2007 टी20 वर्ल्डकप, 2011 वनडे वर्ल्डकप आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी अशी आयसीसी स्पर्धांची तीन विजेतीपदे जिंकून दिली आहेत. तसेच त्याच्याच नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा कसोटीत अव्वल क्रमांकही मिळवला होता.

धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 526 सामने खेळले असून 44.96 च्या सरासरीने 1शतके आणि 108 अर्धशतकांसह 17266 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने यष्टीरक्षक म्हणून 829 विकेट्स घेतल्या आहेत.

दरम्यान, धोनीने जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी तो आयपीएलमध्ये अजूनही खेळत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT