U19 World Cup 2024 Final | India vs Australia X
क्रीडा

U19 World Cup Final: 'पराभूत होऊ, पण...', पराभवाच्या उंबरठ्यावर असताना टीम इंडियाच्या खेळाडूंचे मन जिंकणारे संभाषण

India vs Australia: 19 वर्षांखालील वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारतीय संघ पराभवाच्या उंबरठ्यावर असताना नमन तिवारी आणि मुरुगन अभिषेक यांच्या संभाषणाने अनेक चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

Pranali Kodre

Motivational Talk between Naman Tiwari and Murugan Abhishek during India vs Australia ICC U19 Cricket World Cup Final:

भारतीय युवा संघाला रविवारी 19 वर्षांखालील वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. बेनोनीला झालेल्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षांखालील संघाने 79 धावांनी पराभूत केले.

त्यामुळे उदय सहारनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पण असले तरी या सामन्यात भारतीय संघ पराभवाच्या उंबरठ्यावर असताना नमन तिवारी आणि मुरुगन अभिषेक यांच्या संभाषणाने अनेक चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 254 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 122 धावांवरच 8 विकेट्स गमावल्या होत्या. पण नमन तिवारी आणि अभिषेक मुरूगन यांनी मिळून 9 व्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी केली.

दरम्यान, त्यांची भागीदारी भारताला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशी ठरली नाही. मात्र, ही भागीदारी करत असताना नमन अभिषेकचा आत्मविश्वास वाढवताना दिसत होता.

त्यांची भागीदारी चालू असताना नमन अभिषेकला म्हणत आहे की 'गुरू, लक्षात ठेव पराभूत होऊ, पण यातून शिकून जाऊ.' त्यांचे हे संभाषण स्टंप माईकमध्ये कैद झाले. त्यांच्या या संभाषणाने अनेक चाहत्यांची मात्र मनं जिंकली आहेत.

दरम्यान , अभिषेक 42 धावांवर 9 व्या विकेटच्या रुपात बाद झाला. तर नमन 14 धावांवर नाबाद राहिला. त्याआधी भारताकडून आदर्श सिंगने 47 धावा केल्या होत्या. तसेच मुशीर खानने 22 धावांचे योगदान दिले.

या चौघांव्यतिरिक्त भारताकडून कोणाला दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. त्यामुळे भारताचा डाव 43.5 षटकात सर्वबाद 174 धावांत संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून महिल बिअर्डमन आणि राफ मॅकमिलन यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

तत्पुर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाकडून हरजस सिंगने सर्वाधिक 55 धावांची खेळी केली. तसेच कर्णधार ह्यु वेबगेनने 48, ऑलिव्हर पीकने नाबाद 46 आणि हॅरी डिक्सनने 42 धावांची खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 7 बाद 253 धावा केल्या. भारताकडून राज लिंबानीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder: नवऱ्यापासून झालेली मुलगी आवडत नव्हती; बॉयफ्रेन्डसोबत मिळून आईने 2.5 वर्षाच्या बाळाला संपवले, गोवा हादरला

Ashok Saraf: 'अशें, तुका कळूंक ना?' अशोक मामांच्या तोंडी पुन्हा प्रोफेसर धोंड; सोशल मीडियावर VIDEO तूफान व्हायरल

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT