Suryakumar Yadav Yashasvi Jaiswal Ruturaj Gaikwad Shubman Gill Tilak Varma X
क्रीडा

Year Ending: सूर्या ते तिलक वर्मा, 2023 मध्ये भारतासाठी T20I मध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप-5 फलंदाज

Most T20I Runs for India: आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 2023 वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 भारतीय फलंदाजांबद्दल जाणून घ्या.

Pranali Kodre

Most T20I Runs for India in 2023:

भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताने टी20 आणि वनडे मालिका जिंकली आहे. दरम्यान, या मालिकेनंतर 2023 वर्षात भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज निश्चित झाले आहेत.

2023 मध्ये आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

5. तिलक वर्मा

भारताचा युवा फलंदाज तिलक वर्मा भारताकडून 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.

त्याने यावर्षी भारताकडून 15 टी20 सामन्यांमध्ये 34.44 च्या सरासरीने 310 धावा केल्या. यामध्ये त्याने 2 अर्धशतके केले आहेत. बांगलादेशविरुद्ध आशियाई क्रीडा स्पर्धेत केलेली नाबाद 55 धावांची खेळी त्याची यावर्षीची सर्वोत्तम खेळी ठरली.

4. शुभमन गिल

भारताचा युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल भारताकडून 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.

गिलने यावर्षात भारताकडून 13 टी20 सामने खेळले असून 26 च्या सरासरीने 1 शतक आणि 1 अर्धशतकासह 312 धावा केल्या आहेत. त्याने या वर्षात अहमदाबादला न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 सामन्यात नाबाद 126 धावांची खेळी केली होती.

3. ऋतुराज गायकवाड

युवा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड भारताकडून 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.

त्याने या वर्षात भारताकडून 10 टी20 सामने खेळले. यामध्ये 60.83 च्या सरासरीने 1 शतक आणि 2 अर्धशतकांसह 365 धावा केल्या. त्याने गुवाहाटीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टी20 सामन्यात नाबाद 123 धावांची खेळी केली होती.

2. यशस्वी जयस्वाल

भारताकडून 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर यशस्वी जयस्वाल आहे.

त्याने या वर्षात भारताकडून 15 टी20 सामने खेळताना 33.07 सरासरीने 430 धावा केल्या आहेत. त्याने या वर्षात 1 शतक आणि 3 अर्धशतकेही केली. त्याने हे एकमेव शतक नेपाळविरुद्ध आशियाई क्रीडा स्पर्धेत केले. त्याने त्या सामन्यात 100 धावा केल्या.

1. सूर्यकुमार यादव

भारताचा टी20 क्रिकेटमधील स्टार फलंजाज सूर्यकुमार यादव भारताकडून 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल क्रमांकावर आहे.

त्याने यावर्षात भारतासाठी 18 टी20 सामने खेळताना 2 शतके आणि 5 अर्धशतकांसह 48.86 च्या सरासरीने 733 धावा ठोकल्या. त्याने श्रीलंकेविरुद्ध राजकोटला केलेली नाबाद 112 धावांची खेळी त्याची यावर्षीची टी20 मधील सर्वोच्च खेळी ठरली.

याशिवाय त्याने यावर्षी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांविरुद्धच्या टी२० मालिकेत रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्वही केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकली, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका बरोबरीत सुटली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Bomb Blast: 'पहिला स्फोट झाला अन् मदत करायला गेले...', पाकिस्तानात बॅक-टू-बॅक धमाके, 7 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

Goa Coal Mining: "गोव्यातून कोळसा हद्दपार करा!", गोवा फॉरवर्डने फुंकले आंदोलनाचे रणशिंग; सरकारला दिला थेट इशारा

Bangladesh Hindu Protest: "प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेवर बूट ठेवून केली विटंबना..."; इस्लामिक कट्टरपंथियांविरोधात बांगलादेशात हिंदूंचा महाआक्रोश VIDEO

India Population: लोकसंख्या का वाढवता?

Sanjivani Sugar Factory: संजीवनी साखर कारखान्याचे कर्मचारी वेतनाविना; वित्त खात्यात फाईल प्रलंबित, 2 महिन्यांचे वेतन अडल्याने कोंडी

SCROLL FOR NEXT