Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Rohit Sharma ला विश्वविक्रम मोडण्याची संधी, T20 मध्ये करणार मोठी कामगिरी

Australia tour of India, 2022: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला T20 सामना 20 सप्टेंबर रोजी मोहाली येथे खेळवला जाणार आहे.

दैनिक गोमन्तक

Australia tour of India, 2022: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला T20 सामना 20 सप्टेंबर रोजी मोहाली येथे खेळवला जाणार आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघासाठी ही मालिका खूप महत्त्वाची असणार आहे. यासाठी आता भारतीय संघ पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे. ही मालिका कर्णधार रोहित शर्मासाठी खास असणार आहे. वास्तविक, हिट मॅन या मालिकेदरम्यान मोठा विश्वविक्रम करु शकतो. रोहित सध्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा फलंदाज आहे. त्याला T20 मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम मोडण्याची संधी असेल, जो या मालिकेदरम्यान नक्कीच मोडेल.

दरम्यान, सध्या T20 मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम मार्टिन गुप्टिलच्या नावावर आहे. मार्टिन गुप्टिलने आतापर्यंत T20 मध्ये एकूण 172 षटकार मारले आहेत. रोहितने आतापर्यंत 171 षटकार मारले आहेत. म्हणजेच 2 षटकार मारल्यानंतर हिटमॅन हा विश्वविक्रम मोडून पहिल्या क्रमांकावर पोहोचेल. रोहितने आतापर्यंत 136 सामन्यांत 171 षटकार मारले आहेत, तर गुप्टिलने कारकिर्दीत आतापर्यंत 121 सामन्यांत 172 षटकार मारले आहेत. म्हणजेच, हिट मॅन सर्वाधिक षटकारांचा विक्रम करण्यापासून फक्त दोन षटकार दूर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात 3 सामन्यांची T20 मालिका खेळवली जाणार आहे.

भारत संघ

रोहित शर्मा (Rohit Sharma) (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह

ऑस्ट्रेलियन संघ:

शॉन अ‍ॅबॉट, अ‍ॅश्टन आगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, अ‍ॅरॉन फिंच, कॅमेरॉन ग्रीन, जोश हॅझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, अ‍ॅडम झम्पा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gandhi Jayanti: एका दिवसाची गांधी जयंती अन् 364 दिवस अंधार; झाडू हातात घेण्यापेक्षा गांधीविचार जगण्याची गरज

Colvale Jail Threat: कैद्याकडून व्हिडिओ कॉलवर सुरा दाखवून धमकी? कोलवाळ कारागृहात खळबळ; हाय-सिक्युरिटी ब्लॉकची झडती

Shukra Gochar 2026: शरद पौर्णिमेचा चमत्कार! धनदाता शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन, 5 राशींचे पालटणार नशीब; होणार पैशांचा वर्षाव

Teachers Digital Toolkit: गोव्यात शिक्षकांना मिळणार डिजिटल टूलकिट; 5,100 टॅब्लेटसाठी 'इन्फोटेक'कडून निविदा

Plastic Waste Management: बहुपदरी प्लास्टिक पॅकेजिंगवर आता 'डिपॉझिट रिफंड' अनिवार्य करा; गोवा सरकारची 'सीपीसीबी'कडे शिफारस

SCROLL FOR NEXT