KL Rahul Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके कोणी ठोकली? पाहा टॉप-5 लिस्ट!

IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग 31 मार्चपासून सुरु होत आहे. जगातील या सर्वात श्रीमंत क्रिकेट लीगमध्ये जगभरातील खेळाडू सहभागी होतात.

Manish Jadhav

IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग 31 मार्चपासून सुरु होत आहे. जगातील या सर्वात श्रीमंत क्रिकेट लीगमध्ये जगभरातील खेळाडू सहभागी होतात. त्याच्या लोकप्रियतेचे एक प्रमुख कारण म्हणजे या टी-20 लीगमध्ये उत्तुंग षटकार पाहायला मिळतात.

षटकार आणि चौकारांच्या जोरावर या लीगमध्ये खेळाडूंनीही शतके झळकावली आहेत. चला एक नझर टाकूया. या स्पर्धेतील टॉप-5 फलंदाज ज्यांनी सर्वाधिक शतके ठोकली आहेत -

दरम्यान, या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी स्टार फलंदाज केएल राहुलही (KL Rahul) मागे नाही. त्याच्या नावावर 4 आयपीएल शतके आहेत. सर्वाधिक शतके करणाऱ्यांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचाही समावेश आहे. वॉर्नरच्या नावावर आयपीएलमध्ये 4 शतके आहेत.

तसेच, या यादीत इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जोस बटलरचाही समावेश आहे. आयपीएलमध्येही त्याची 5 शतके आहेत. गेलनंतर सर्वाधिक शतके करणारा भारतीय फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) हा दुसरा फलंदाज आहे. आयपीएलमध्ये विराट कोहलीची 5 शतके आहेत.

शिवाय, वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटर ख्रिस गेलच्या नावावर या स्पर्धेत सर्वाधिक शतके आहेत. गेलने आयपीएलमध्ये 6 शतके झळकावली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये महिलेचं लाजिरवाणं कृत्य; 5 तास सुरू होता प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

ओळखणंही झालं कठीण! WWE दिग्गज John Cenaचा धक्कादायक लूक; फोटो पाहून चाहतेही अवाक्!

Ardh Kendra Yog 2026: बँक बॅलन्स वाढणार, सगळ्या चिंता मिटणार! 'अर्धकेंद्र योग' बदलणार 5 राशींचे भाग्य; धनाचा होणार वर्षाव

Bicholim Heavy Rain: डिचोलीत पावसाचा पुन्हा तडाखा; दोन ठिकाणी झाडे कोसळली

Indus Waters Treaty Row: "...तर हात कापून टाकू!" सिंधु जल करारावरुन पाकिस्तानी मंत्र्यांचा जळफळाट; दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकड्यांची भारताविरोधात आगपाखड

SCROLL FOR NEXT