Portugal Vs Morocco Dainik Gomantak
क्रीडा

Portugal Vs Morocco: पोर्तुगाल वर्ल्डकपमधून बाहेर! रोनाल्डोला पुर्वार्धात न खेळवण्याची चूक नडली...

1-0 गोलफरकाने विजयासह मोरक्को प्रथमच सेमीफायनलमध्ये दाखल; रोनाल्डोच्या नावावर नवा विक्रम

Akshay Nirmale

Portugal Vs Morocco: फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेतील तिसऱ्या क्वार्टर फायनल लढतीत शनिवारी मोरक्कोने क्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाला 1-0 असे पराभूत करत सेमी फायनल फेरी गाठली. कतारच्या अलथुमामा स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात मोरक्कोच्या युसेफ एन नेसिरी याने पुर्वार्धातील 42 व्या मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला.

(FIFA World Cup 2022)

या विजयामुळे मोरक्कोच्या संघाने इतिहास घडवला आहे. मोरक्कोचा संघ प्रथमच फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेच्या सेमी फायनल फेरीत दाखल झाला आहे, तर या पराभवाने क्रिस्तियानो रोनाल्डो आणि पोर्तुगालचा प्रवास येथे थांबला आहे.

दोन्ही संघांचा खेळ तोडीस तोड झाला. मोरक्को संघाचे डिफेंडिंग उत्तम होते. त्यांनी पोर्तुगालला आक्रमण करण्यापासून रोखले. पोर्तुगालच्या अनेक संधी हुकल्या. पुर्वार्धातील मोरक्कोच्या गोल नंतर उत्तरार्धात पोर्तुगालने खूप प्रयत्न केले, पण त्यांना गोलची परतफेड करणे जमले नाही. क्रिस्तियानाे रोनाल्डो याचा हा अखेरचा वर्ल्डकप आहे. पुढील वर्ल्डकपमध्ये तो खेळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे पोर्तुगालसह जगभरातील रोनाल्डोच्या चाहत्यांना पोर्तुगाल सेमी फायनलमध्ये पोहचेल, अशी आशा होती, पण रोनाल्डोच्या चाहत्यांचा भ्रमनिरास झाला. सामन्यानंतर खुद्द रोनाल्डोलाहा अश्रु अनावर झाले. रोनाल्डोने भरल्या डोळ्यांनीच स्टेडियमचा निरोप घेतला.

रोनाल्डोचा नवा विक्रम

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो याला संघ व्यवस्थापनाने चक्क 51 व्या मिनिटाला मैदानात उतरवले. रोनाल्डो हा राफेल गुरेरो याचा बदली खेळाडू म्हणून मैदानात आला. दरम्यान, मैदानात उतरताच एक विक्रम रोनाल्डोने स्वतःच्या नावे नोंदवला. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळण्याच्या विक्रमाची बरोबरी रोनाल्डोने केली. हा रोनाल्डोचा 196 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. त्याने कुवैतच्या बदेल अल मुतावा यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.

यापुर्वी हे दोन संघ वर्ल्डकप स्पर्धेत दोन वेळा आमनेसामने आले आहेत. आणि दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. राऊंड ऑफ 16 मध्ये मोरक्कोने स्पेनला पेनल्टी शुटआऊटवर पराभूत केले होते. तर पोर्तुगालने स्वित्झर्लंडला 6-1 अशा गोलफरकाने पराभूत केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fishing Boat Accident: काणकोणातील राजबाग किनाऱ्यावर पुन्हा बोट उलटली, स्थानिक मदतीसाठी धावले!

Viral Video: बिहारमधून दिसू लागला हिमालय आणि माऊंट एव्हरेस्ट; मनमोहक व्हिडिओ आला समोर Watch

Goa Politics: आमदार भाजपमध्ये जाणार नाहीत याची गॅरंटी द्या! ‘आप’चा काँग्रेससोबत युतीस स्पष्ट नकार

Shubhman Gill: "त्यांनी भारताला स्वबळावर अनेक सामने जिंकून दिले, आम्हाला त्यांची गरज..." नवा कर्णधार शुभमन गिलचे रोहित-विराटबाबत मोठं वक्तव्य

IND vs WI 2nd Test: टीम इंडियाला धक्का, दिल्ली कसोटीत जसप्रीत बुमराहच्या खेळण्यावर सस्पेन्स, 'या' खेळाडूला संधी मिळू शकते

SCROLL FOR NEXT