Mohammed Siraj to replace injured Harshit Rana in T20 World Cup squad Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup 2026: टीम इंडियाला मोठा झटका! हर्षित राणा टी-20 विश्वचषकातून बाहेर; 'या' खेळाडूची लागली लॉटरी

Mohammed Siraj to replace injured Harshit Rana in T20 World Cup squad: टी२० विश्वचषक २०२६ च्या मोहिमेला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे.

Sameer Amunekar

टी२० विश्वचषक २०२६ च्या मोहिमेला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा गुडघ्याच्या दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याची भारतीय संघात निवड होण्याची दाट शक्यता असून, आज संध्याकाळपर्यंत निवडकर्ते यावर अधिकृत शिक्कामोर्तब करू शकतात.

सराव सामन्यात दुखापत

हर्षित राणाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. अवघ्या एका षटकाच्या गोलंदाजीनंतर त्याला गुडघ्याच्या त्रासामुळे मैदान सोडावे लागले. तो आपला रन-अप पूर्ण करू शकत नव्हता आणि वेदनेमुळे त्याने मैदानावरच पाय धरला होता. 

सुरुवातीला कर्णधार सूर्यकुमार यादवने हर्षित पूर्णपणे बाहेर झाला नसल्याचे सांगितले होते, परंतु वैद्यकीय अहवालानंतर तो विश्वचषकासाठी तंदुरुस्त नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

फलंदाजाची उणीव भासणार

हर्षित राणा केवळ गोलंदाज नसून, तो खालच्या क्रमांकावर उपयुक्त फलंदाजी करण्यासाठीही ओळखला जातो. सूर्यकुमार यादवने मान्य केले की, हर्षितच्या अनुपस्थितीमुळे संघाच्या संयोजनावर परिणाम होईल. "१५ खेळाडूंच्या गोटातून एखादा महत्त्वाचा खेळाडू बाहेर पडणे हा मोठा फटका आहे. हर्षित ९ व्या क्रमांकावर फलंदाजीचा पर्याय देत होता, मात्र आता आमच्या पहिल्या ८ फलंदाजांना आपली जबाबदारी चोख पार पाडावी लागेल," असे सूर्याने स्पष्ट केले.

अनुभवी मोहम्मद सिराजला संधी

हर्षितच्या जागी प्रसीध कृष्णा आणि खलील अहमद यांच्या नावांचीही चर्चा होती, मात्र निवडकर्त्यांनी अनुभवी मोहम्मद सिराजला प्राधान्य दिले आहे. 

सिराजने याआधी मोठ्या स्पर्धांमध्ये भारतीय संघासाठी मोलाची कामगिरी केली असून, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांच्यासोबत त्याची उपस्थिती भारतीय वेगवान माऱ्याला अधिक धार देईल. उद्या रंगणाऱ्या अमेरिकेविरुद्धच्या (USA) पहिल्या सामन्यापूर्वी भारतीय संघात हा मोठा बदल पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: एप्रिल महिन्यात अग्निपरीक्षा! 'या' राशीच्या नशिबात शनी अन् राहु-केतूचा 'डेंजर झोन'; ग्रहांची स्थिती ठरणार घातक

8th Pay Commission : पगारवाढीचा 'धमाका'! 7व्या वेतन आयोगाचे सर्व रेकॉर्ड मोडणार 8वा वेतन आयोग? महागाईला उत्तर देण्यासाठी नवा प्लॅन

Responsible Tourism in Goa: त्रास फक्त पर्यटकांनाच होतो, गोमंतकीयांना होत नाही का? बेजबाबदार वर्तनामुळे वादाचे पडसाद

Chorla Ghat Traffic: चोर्ला घाटात जीव धोक्‍यात, डंपरांचा सुळसुळाट! वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोका; बेळगावला खरेदीला जाणं बनलं कठीण

Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ तोरसे, तांबोसेत घुसण्याच्या तयारीत, पिकांची हानी! तातडीने बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी

SCROLL FOR NEXT