Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SA: दुखापतीमुळे टी-20 मालिकेतून बुमराह आऊट, या खेळाडूला संघात मिळाली संधी

Team India: बुमराहच्या पाठीला दुखापत झाली असून तो सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे.

दैनिक गोमन्तक

IND vs SA: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी जाहीर केले की, जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे त्याच्या जागी मोहम्मद सिराजची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, बुमराहच्या पाठीला दुखापत झाली असून तो सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय T20 संघ: रोहित शर्मा (c), केएल राहुल (vc), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (wk), दिनेश कार्तिक (wk), आर अश्विन, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, दीपक चहर, उमेश यादव, श्रेयस अय्यर, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज

दरम्यान, गुरुवारी एक अहवाल समोर आला होता, ज्यामध्ये जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) पाठीच्या दुखापतीबद्दल सांगण्यात आले होते. अहवालानुसार, या दुखापतीमुळे बुमराह आगामी टी-20 विश्वचषकातूनही (T-20 World Cup) बाहेर जाऊ शकतो. वास्तविक, बुमराहची ही दुखापत बरी होण्यासाठी 4 ते 6 महिने लागू शकतात.

तसेच, या दुखापतीमुळे बुमराहला आशिया कप 2022 मधूनही बाहेर व्हावे लागले होते. इंग्लंड दौऱ्यानंतर जसप्रीत बुमराह एनसीएमध्ये प्रशिक्षण घेत होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) टी-20 मालिकेत त्याने पुनरागमन केले तेव्हा असे वाटत होते की, आता सर्व काही ठीक आहे, परंतु त्याच्या दुखापतीवरुन आता असे दिसून येत आहे की, बुमराह पुनरागमन करण्यापूर्वी नीट बरा होऊ शकला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 06 August 2025: तांत्रिक कामे किंवा इलेक्ट्रॉनिक बाबतीत दक्षता घ्या, आरोग्याकडे दुर्लक्ष नको

Goa Fake Wedding Party: ना सासरचं टेन्शन, ना खर्चाची चिंता! गोव्यात 'फेक वेडिंग' इव्हेंटनं तरूणांना दिला लग्नसोहळ्याचा अनुभव

Uttarakhand Cloudburst: उत्तरकाशीत निसर्ग कोपला, ढगफुटीमुळे घरं गेली वाहून; कित्येकजण बेपत्ता

कॅसिनोंमध्ये बेकायदा लाइव्ह गेमिंग सुरूच; पोस्टाच्या स्कॅमनंतर सरदेसाईंचे आणखी एक स्टिंग ऑपरेशन, शेअर केला VIDEO

Team India: टीम इंडियावर संकटाचे ढग! रोहित-विराट एकदिवसीय विश्वचषक खेळणार नाही? समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT