Team India X/BCCI
क्रीडा

SA vs IND: केपटाऊनमध्ये मियाँ मॅजिक! द. आफ्रिका पहिल्या डावात 55 धावांत गारद, सिराजच्या 6 विकेट्स

South Africa vs India: भारतीय संघाने मोहम्मद सिराजच्या 6 विकेट्सच्या जोरावर केपटाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात 55 धावांवर सर्वबाद केले.

Pranali Kodre

South Africa vs India 2nd Test at Cape Town:

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना बुधवारी (3 जानेवारी) चालू झाला आहे. केपटाऊनमधील न्यूलँड्स स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ 23.2 षटकात 55 धावांवर सर्वबाद झाला.

विशेष म्हणजे सामन्याच्या पहिल्याच सत्रात दक्षिण आफ्रिका संघ सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून केवळ दोघांनाच दोन आकडी धावसंख्या गाठता आली. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गारने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे एल्गारसह एडेन मार्करम सलामीला फलंदाजीला उतरले. मात्र मोहम्मद सिराजने चौथ्या षटकात मार्करमला 2 धावांवर बाद केले, तर सहाव्या षटकात शेवटचा सामना खेळणाऱ्या डीन एल्गारने 4 धावांवर त्रिफळाचीत केले.

या धक्क्यातून नंतर दक्षिण आफ्रिका सावरले नाहीत. 9 व्या षटकात जसप्रीत बुमराहने पदार्पणवीर स्ट्रिस्टन स्टब्सला 3 धावांवर माघारी धाडले, तर पुढच्याच षटकात सिराजने टोनी डी झोर्झीचा अडथळाही दूर केला.

यानंतर डेव्हिड बेडिंगघम आणि काईल वेरेयन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. केवळ त्यांनाच 10 धावांचा टप्पा पार करता आला. पण त्यांचीही जोडी फार वेळ टिकू शतकी नाही. 16 व्या षटकात सिराजने डेव्हिड बेडिंगघमला 12 धावांवर बाद केले, तर याच षटकात मार्को यान्सिनलाही शुन्यावर सिराजने माघारी घाडले.

पाठोपाठ सिराजने 18 व्या षटकात वेरेयनलाही 15 धावांवर गिलच्या हातून झेलबाद केले. अखेरच्या तीन विकेट्स मुकेश कुमार आणि जसप्रीत बुमराहने मिळून घेत दक्षिण आफ्रिकेचा डाव संपवला.

या डावात भारताच्या क्षेत्ररक्षकांनी सर्वाधिक झेल स्लीपमध्ये घेतले. यशस्वी जयस्वालने सर्वाधिक 3 झेल घेतले.

दरम्यान, सिराजची ही कसोटीच्या एका डावात 6 विकेट्स घेण्याची पहिलीच वेळ आहे. त्याने 9 षटकात 15 धावा देत 6 विकेट्स घेतल्या. तसेच भारताकडून या डावात जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT