Team India PTI
क्रीडा

SA vs IND: सिराज मियाँ चमकला! एल्गार, मार्करमसह 6 विकेट्स घेत दिग्गजांमध्ये मिळवलं स्थान

Mohammed Siraj: केपटाऊन कसोटीत भारताच्या मोहम्मद सिराजने 6 विकेट्स घेत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.

Pranali Kodre

South Africa vs India 2nd Test at Cape Town, Mohammed Siraj 6 Wickets:

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात बुधवारपासून (3 जानेवारी) कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू झाला आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी पहिल्याच सत्रात दक्षिण आफ्रिकेचा संघ सर्वबाद झाला. भारताकडून मोहम्मद सिराजने 6 विकेट्स घेतल्या. यासह त्याने खास विक्रमही केला आहे.

सिराजने 9 षटक गोलंदाजी करताना 3 षटके निर्धाव टाकली. तसेच 15 धावा खर्च करत 6 विकेट्स घेतल्या. त्यामुळे ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी ठरली. तसेच कसोटीत एका डावात 6 विकेट्स घेण्याची ही त्याची पहिलीच वेळ आहे. त्याने यापूर्वी 2 वेळा कसोटीत एका डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.

याशिवाय दक्षिण आफ्रिकेत भारतीय गोलंदाजाने कसोटीमध्ये केलेले हे तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन ठरले. त्यामुळे त्याने अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, हरभजन सिंग अशा दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवले आहे.

दक्षिण आफ्रिकेत कसोटीमध्ये भारताकडून एका डावात सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करण्याचा विक्रम शार्दुल ठाकूरच्या नावावर आहे. शार्दुलने 2022 मध्ये जोहान्सबर्गला झालेल्या सामन्यात 61 धावांत 7 विकेट्स घेतल्या होत्या.

तसेच हरभजन सिंगने 2011 मध्ये केपटाऊनमध्येच 120 धावांत 7 विकेट्स घेतल्या होत्या. या दोघांनंतर आता तिसऱ्या क्रमांकावर सिराज आला आहे. त्याच्या पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेत कुंबळे, श्रीनाथ, रविंद्र जडेजा यांनीही 6 विकेट्स घेतल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेत कसोटीमध्ये एका डावात सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करणारे भारतीय गोलंदाज -

  • 7/61 - शार्दुल ठाकूर, जोहान्सबर्ग, 2022

  • 7/120 - हरभजन सिंग, केपटाऊन, 2011

  • 6/15 - मोहम्मद सिराज, केपटाऊन, 2024

  • 6/53 - अनिल कुंबळे, जोहान्सबर्ग, 1992

  • 6/76 - जवागल श्रीनाथ, गकेबेरा, 2001

  • 6/138 - रविंद्र जडेजा, डर्बन, 2013

दक्षिण आफ्रिका 55 धावांत सर्वबाद

दरम्यान, बुधवारी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 23.2 षटकात 55 धावांवर संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेकडून केवळ डेव्हिड बेडिंगघम (12) आणि काईल वेरेयन (15) यांनाच दोन आकडी धावसंख्या गाठता आली. बाकी कोणत्याच फलंदाजाने 10 धावांचा टप्पा पार केला नाही.

भारताकडून गोलंदाजी करताना सिराज व्यतिरिक्त जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT