Mohammed Shami Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: 'फालतू बोलू नका...,’ पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूच्या वादग्रस्त वक्तव्यावर शमी भडकला

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडिया चमकदार कामगिरी करत आहे. भारतीय खेळाडूंचा दमदार फॉर्म कायम आहे.

Manish Jadhav

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडिया चमकदार कामगिरी करत आहे. भारतीय खेळाडूंचा दमदार फॉर्म कायम आहे. त्यामुळेच विश्वचषकात आतापर्यंत खेळलेले आठही सामने भारताने जिंकले आहेत.

भारताच्या उत्कृष्ट कामगिरीमध्ये गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. टीम इंडियाचे गोलंदाज विश्वचषकात सातत्याने विकेट घेत आहेत. दरम्यान, विश्वचषकातील भारताचा हाच फॉर्म पाकिस्तान्यांना खुपत आहे.

ते सातत्याने टीम इंडिया, बीसीसीआय आणि आयसीसीविरुद्ध अनुचित विधाने करत आहेत. पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटपटूनेही असेच काहीसे केले. त्यानंतर मोहम्मद शमीने त्या खेळाडूला चोख प्रत्युत्तर दिले.

पाकिस्तानी क्रिकेटरचे वादग्रस्त विधान

भारतीय संघाने आपले शेवटचे तीन सामने उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर जिंकले. जिथे त्यांनी इंग्लंडला 129 धावांत, श्रीलंकेला 55 धावांत आणि दक्षिण आफ्रिकेला 83 धावांत गुंडाळले.

भारतीय गोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू हसन रझा एका टीव्ही कार्यक्रमादरम्यान म्हणाले की, 'टीम इंडियाला आयसीसी आणि बीसीसीआयकडून वेगळ्या प्रकारचा चेंडू दिला जात आहे.'

त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावरही (Social Media) व्हायरल झाले आहे. हे वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर आता मोहम्मद शमीने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शमीने सडेतोड उत्तर दिले

मोहम्मद शमीने (Mohammed Shami) हसन रझा यांचे वादग्रस्त विधान व्हायरल झाल्यानंतर त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करुन त्यांना चोख प्रत्युत्तर दिले.

शमीने आपल्या स्टोरीत लिहिले की, "लाज वाटू द्या, खेळावर लक्ष केंद्रित करा. असा मूर्खपणा करु नका, कधीकधी इतरांच्या यशाचा आनंद घ्यायला शिका. शिट यार, हा आयसीसी विश्वचषक आहे, तुमच्या घरची स्पर्धा नाही आणि तुम्ही खेळाडू होतात ना?

वसीम भाईने तुम्हाला समजावल्यानंतरही तुम्हाला कळत नाहीये. तुमचा वसीम अक्रमवर विश्वास नाहीये का? तुम्ही तुमची प्रशंसा करण्यात व्यस्त आहात सर." वास्तविक, वासिम अक्रमने भारतीय गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले होते. याबाबत मोहम्मद शमीने म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Goa Live News: गणेश मूर्ती तयार करण्याचे का पुढील ४-५ दिवसांत काम पूर्ण होण्याच्या मार्गावर

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

Ponda: बनावट दाखला प्रकरण! नगरसेवकाला जामीन; काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT