Mohammad Shami ICC
क्रीडा

SA vs IND: मोहम्मद शमी होणार द. आफ्रिका दौऱ्यातून बाहेर? मोठे कारण आले समोर

Mohammad Shami: मोहम्मद शमी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर होऊ शकतो.

Pranali Kodre

Mohammad Shami may ruled out from Team India's South Africa Tour 2023-24:

भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेली आहे. या दौऱ्यात 3 वनडे, 3 टी20 आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

या दौऱ्यातील वनडे आणि टी20 मालिकेसाठी रोहित शर्मा, विराट कोहलीसह मोगम्मद शमीलाही विश्रांती देण्यात आली आहे. दरम्यान, कसोटी मालिकेसाठी या खेळाडूंचे भारतीय संघात पुनरागमन होणार आहे. पण तरी शमीच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे.

शमीला घोट्याची दुखापत झाली आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याला या दुखापतीची समस्या ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 दरम्यान भारतात झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेदरम्यानही जाणवत होती, असे समोर आले होते. पण असे असतानाही, त्याने भारतासाठी या स्पर्धेत शानदार कामगिरी करताना सर्वाधिक 24 विकेट्स घेतल्या होत्या.

दरम्यान, या स्पर्धेनंतर शमीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टी20 मालिकेसाठीही विश्रांती देण्यात आली होती. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 आणि वनडे मालिकेसाठीही त्याला विश्रांती देण्यात आली आहे.

यशिवाय बीसीसीआयने माहिती दिली होती की त्याची कसोटी मालिकेसाठी उपलब्धता त्याच्या फिटनेसवर अवलंबून असणार आहे. त्यामुळे जर शमी कसोटी मालिकेपर्यंत पूर्ण तंदुरुस्त झाला नाही, तर तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर होऊ शकतो.

सध्या शमीचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी आणि त्याआधी भारतीय संघातच होणाऱ्या तीन दिवसीय सराव सामन्यासाठी समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, जर शमी या कसोटी मालिकेत खेळला नाही, तर भारताकडे मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्यासह वेगवान गोलंदाजीसाठी शार्दुल ठाकूर, मुकेश कुमार आणि प्रसिद्ध कृष्णा हे पर्याय आहेत.

कसोटी मालिकेतील पहिला सामना 26 ते 30 डिसेंबर दरम्यान सेंच्युरियनला होणार आहे. हा बॉक्सिंग डे कसोटी सामना असेल, तसेच 3 ते 7 जानेवारी 2024 दरम्यान दुसरा कसोटी सामना केपटाऊनला होणार आहे. त्याआधी 10 ते 21 डिसेंबर दरम्यान टी20 आणि वनडे मालिका होणार आहे.

कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज , मुकेश कुमार, मोहम्मद शमी*, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार) आणि प्रसिद्ध कृष्णा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT