Vaibhav Sooryavanshi & Abhishek Sharma Dainik Gomantak
क्रीडा

''वैभव सूर्यवंशी-अभिषेक शर्मा जोडी टीम इंडियाचे लॉन्ग टर्म ओपनर असू शकत नाहीत...'' माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Vaibhav Sooryavanshi & Abhishek Sharma: संजू सॅमसनसारख्या अनुभवी खेळाडूला बाहेर बसवून वैभवला संघात स्थान देण्याच्या संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावरुन आता क्रिकेट विश्वात मोठी चर्चा आणि वाद सुरु झाला.

Manish Jadhav

Vaibhav Sooryavanshi & Abhishek Sharma: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एका सुवर्णक्षराची नोंद झाली. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याला स्टार यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली. वैभवने अवघ्या 15 वर्षे आणि 99 दिवस या वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत इतिहास रचला. यासह तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. मात्र, संजू सॅमसनसारख्या अनुभवी खेळाडूला बाहेर बसवून वैभवला संघात स्थान देण्याच्या संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावरुन आता क्रिकेट विश्वात मोठी चर्चा आणि वाद सुरु झाला.

या महत्त्वाच्या मुद्द्यावर भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने आपल्या यूट्यूब चॅनेलवर टीम इंडियाच्या कामगिरीचे विश्लेषण करताना खेळाडूंच्या निवडीवर उघडपणे नाराजी व्यक्त केली. कैफने वैभव सूर्यवंशीसारख्या अत्यंत गुणवान आणि तरुण खेळाडूला संघात संधी देण्याच्या निर्णयाचे समर्थन केले असले, तरी हा निर्णय संजू सॅमसनला बाहेर बसवून घ्यायला नको होता, असे स्पष्ट मत मांडले. कैफच्या मते, भारताच्या टी-20 संघात वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा यांची जोडी दीर्घकाळासाठी सलामी देऊ शकत नाही. यामागे त्याने डाव्या आणि उजव्या हाताच्या फलंदाजांचे नसलेले संयोजन हे सर्वात मोठे कारण सांगितले.

कैफने या संदर्भात टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील भारतीय संघाच्या अनुभवाचा दाखला दिला. जेव्हा संजू सॅमसन संघात नव्हता आणि ईशान किशन व अभिषेक शर्मा हे दोन डाव्या हाताचे फलंदाज सलामीला येत होते, तेव्हा भारतीय संघाला मोठ्या भागीदारी रचताना प्रचंड अडचणी आल्या होत्या. दोन डाव्या हाताचे सलामीवीर प्रतिस्पर्धी संघाच्या ऑफ-स्पिन गोलंदाजांसमोर सहज बाद होऊ शकतात, अशी भीती त्याने व्यक्त केली. दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा पार्ट-टाईम ऑफ-स्पिनर विल जॅक्सने वैभव सूर्यवंशीला यष्टिचित केले, हे याचेच उत्तम उदाहरण आहे.

भारतीय संघाच्या (Team India) पहिल्या सात फलंदाजांमध्ये आधीच 6 खेळाडू डाव्या हाताचे आहेत, त्यामुळे संजू सॅमसनचे संघात असणे संतुलन राखण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. कैफने सल्ला दिला की, जर संघ व्यवस्थापनाला वैभव आणि अभिषेक दोघांनाही सोबत खेळवायचे असेल, तर संजू सॅमसनने सलामीला यावे आणि या दोघांपैकी एकाने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी. संघ निवडताना केवळ प्रतिभेचा विचार न करता योग्य फलंदाजी क्रम आणि तांत्रिक संतुलन राखणे भविष्यासाठी आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

SCROLL FOR NEXT