Mohammad Hafeez On Babar Azam: भारतीय संघाने धमाकेदार अंदाजात पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने भारतासाठी शानदार खेळी खेळली. मात्र पाकिस्तानच्या दारुण पराभवामुळे पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हाफीज संतापला असून त्याने बाबर आझमवर जोरदार टीका केली आहे.
मोहम्मद हाफीजने हे वक्तव्य केले
पाकिस्तानच्या पराभवानंतर मोहम्मद हाफिज (Mohammad Hafeez) म्हणाला की, 'बाबर आझमचे (Babar Azam) कर्णधारपद पवित्र गायीसारखे आहे, ज्यावर टीका केली जाऊ शकत नाही. हा सलग तिसरा मोठा सामना होता, ज्यामध्ये आपल्याला बाबरच्या कर्णधारपदातील त्रुटी दिसून आल्या. परंतु तो 32 वर्षांचा होईल तोपर्यंत तो शिकेल असे आपण ऐकत आहोत. जेव्हा टीम इंडिया (Teami India) 7व्या षटकापासून 11व्या षटकापर्यंत धावा काढण्यासाठी संघर्ष करत होती. त्यावेळी बाबर आझमला षटके पूर्ण करण्यासाठी फिरकीपटू का मिळाला नाही?'
नवाजला 20 वे ओव्हर का आले?
पुढे बोलताना मोहम्मद हाफीज म्हणाला की, 'बाबर आझमने मोहम्मद नवाजला 20 वे ओव्हर का दिले? एवढ्या महत्त्वाच्या सामन्यात तुम्ही एवढी मोठी चूक कशी काय करु शकता. नवाज हा डावखुरा फिरकी गोलंदाज आहे, पण शेवटच्या षटकात त्याचा वापर सीम गोलंदाज म्हणून करण्यात आला. आम्ही तो सामना जिंकू शकलो असतो, पण एका चुकीच्या निर्णयामुळे हा सामना आपल्या हातातून गेला.'
अखेरच्या षटकात भारताचा विजय झाला
टीम इंडियाला शेवटच्या षटकात विजयासाठी 16 धावांची गरज होती. त्यानंतर कर्णधार बाबर आझमने मोहम्मद नवाजकडे चेंडू सोपवला, जो चुकीचा निर्णय ठरला. या षटकात नवाझने हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिकला बाद केले तरी तो पाकिस्तानला विजय मिळवून देऊ शकला नाही. विराटने 53 चेंडूत 82 धावा काढल्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.