Team India Dainik Gomantak
क्रीडा

WTC Final: भारत जिंकणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा किताब, पाकिस्तानी क्रिकेटरची भविष्यवाणी

IND vs AUS: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या फायनलचे नाव समोर येताच पाकिस्तानच्या एका दिग्गज क्रिकेटपटूनेही विजेत्याच्या नावाची घोषणा केली आहे.

Manish Jadhav

WTC Final Prediction: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. या चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट मैदानावर 7 ते 11 जून दरम्यान खेळवला जाणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या फायनलचे नाव समोर येताच पाकिस्तानच्या एका दिग्गज क्रिकेटपटूनेही विजेत्याच्या नावाची घोषणा केली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल कोणती टीम जिंकणार आहे हे त्याने सांगितले आहे.

या दिग्गजाने विजेत्याचे नाव सांगितले!

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानचा (Pakistan) माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्याचे नाव उघड केले.

ओव्हलवर होणाऱ्या अंतिम फेरीत तुम्हाला कोण विजयी होईल, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्यावर आमिरने उत्तर दिले की, मला वाटते की भारताला ही फायनल जिंकण्याची चांगली संधी आहे.

भारत दुस-यांदा WTC फायनल पोहोचला

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबद्दल बोलायचे झाल्यास, टीम इंडिया (Team India) सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे.

गेल्या वेळी न्यूझीलंडने भारताला हरवून या विजेतेपदावर कब्जा केला होता, पण यावेळी भारतीय संघ जिंकण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना या वर्षी जूनमध्ये लंडनच्या ओव्हल क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि भारत आमनेसामने असतील.

WTC फायनलपूर्वी कोहलीची बॅट तळपली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताचा महान फलंदाज विराट कोहलीने रविवारी आपले 28 वे शतक पूर्ण केले आणि जवळपास 40 महिन्यांचा दुष्काळ संपवला.

या डावात कोहलीने नॅथन लियॉनविरुद्ध एक धाव घेत 241 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले आणि शतकापर्यंत केवळ पाच चौकार लगावले.

नोव्हेंबर 2019 नंतरचे हे त्याचे पहिले कसोटी शतक आहे. विराट कोहलीच्या नावावर आता सर्व फॉरमॅटसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 75 शतके आहेत, कोहलीने 186 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli Viral Post: विराट कोहलीचा दोन वर्षांनंतर मोठा निर्णय; सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टनं खळबळ!

Mandovi Bridge: मांडवी पुलावर 'नो एन्ट्री'! 11 जानेवारीला 'या' वेळेत नव्या आणि जुन्या पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद

Raia Fire News: ..आणि बघता बघता डोंगरच पेटला! राय येथील घटना; अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न

Tara Sutaria Breakup: तारा सुतारिया आणि वीर पहाडियाचे ब्रेकअप? 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर नात्यात दुरावा Watch Video

Goa Nature Conference 2026: निसर्गाशी नाते करा घट्ट! गोव्यात रंगणार पहिले निसर्ग संमेलन; तारीख, वेळ जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT