Mithali Raj Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2023: ठरलं तर! मिताली दिसणार महिला आयपीएलमध्ये, 'या' संघाने दिली मोठी संधी

मिताली राजला महिला आयपीएलच्या संघासाठी मोठी जबाबदारी निभावताना दिसणार आहे.

Pranali Kodre

Mithali Raj: यावर्षी पहिल्यांदाच महिला आयपीएल (WPL) स्पर्धा पडणार आहे. या स्पर्धेसाठी ५ संघही निश्चित झाले आहेत. याचदरम्यान आता माजी भारतीय कर्णधार मिताली राज या स्पर्धेत एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तिला अहमदाबाद फ्रंचायझीने मार्गदर्शक आणि सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे.

महिला आयपीएममध्ये अदानी स्पोर्ट्सलाईन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने अहमदाबाद फ्रंचायझीचे मालकी हक्क जिंकले आहेत. त्यासाठी त्यांनी पाच संघांमध्ये सर्वाधिक रक्कम मोजत या संघाची मालकी मिळवली. त्यांनी 1289 कोटी रुपये मोजले आहेत.

40 वर्षीय मिताली आता फक्त या संघाला मार्गदर्शनच करणार नाही, तर गुजरातमध्ये तळागाळातही महिला क्रिकेटबद्दल जागरुकता आणि खेळाच्या विकासासाठी मदत करेल.

(Mithali Raj roped in as mentor and advisor of Ahmedabad-based franchise for WPL)

या भूमिकेबद्दल बोलताना मितालीने सांगितले की बीसीसीआयने महिला आयपीएलच्या घेतलेल्या निर्णयामुळे महिला क्रिकेटचा विकास होईल. ती म्हणाली, 'महिला आयपीएलचा पहिला हंगाम ही महिला क्रिकेटसाठी एक उत्तम चाल आहे. अदानी ग्रुपचा यामधील सहभाग खेळाला मोठी चालना देणारा आहे.'

ती पुढे म्हणाली महिला क्रिकेट सातत्याने प्रगती करत आहे आणि अशा प्रकारची प्रेरणा नक्कीच युवा महिला खेळाडूंना व्यावसायिकपणे क्रिकेट खेळण्याचा विचार करण्यासाठी प्रोत्साहित करेल. मला विश्वास आहे की मोठ्या कंपन्यांचा सहभाग प्रभावी असून भारताला वैभव मिळवून देण्याच्या प्रक्रियेला मदत करेल.'

तसेच महिला खेळाडूंसमोरील संधी वाढण्यासाठीही या गोष्टींची मदत होईल, असेही तिने म्हटले.

मितालीबद्दल बोलताना अदानी एंटरप्रायझेसचे संचालक प्रणव अदानी यांनी म्हचले की मिताली एक आदर्श आहे आणि आशा आहे की तिच्या संघातील उपस्थितीतमुळे फक्त क्रिकेटच नाही, तर अन्य खेळांमधील नवीन प्रतिभा शोधण्यासही मदत होईल.

मिताली भारताच्या दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. तिने गेल्यावर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तिने 23 वर्षे क्रिकेट खेळताना वनडेत 232 सामने खेळले असून सर्वाधिक 7805 धावा केल्या आहेत. तसेच तिने 89 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून 2364 धावा केल्या आहेत. तिने 12 कसोटी सामनेही खेळले असून एका द्विशतकासह 699 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT