Mithali Raj  Dainik Gomantak
क्रीडा

मिताली राजने केली क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, हे मोठे स्वप्न राहिले अधुरे

भारताची महान महिला क्रिकेटपटू मिताली राजने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

भारताची महान महिला क्रिकेटपटू मिताली राजने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मिताली राजने प्रदीर्घ काळ भारतीय महिला क्रिकेटची सेवा केली, परंतु आता तिच्यावर क्रिकेटला अलविदा करण्याची वेळ आली आहे. मात्र, महिला क्रिकेटचा सचिन तेंडुलकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिताली राजचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.

दरम्यान, विस्फोटक फलंदाज मिताली राज (Mithali Raj) ही न्यूझीलंडमध्ये (New Zealand) खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकाचा शेवटचा भाग होती. परंतु तिच्या नेतृत्वाखाली संघ उपांत्य फेरीपूर्वी बाहेर पडला. हा तिच्या कारकिर्दीतील शेवटचा विश्वचषक असल्याचे बोलले जात होते. यातच आता मितालीने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. काही वर्षांपूर्वी तिने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही (International Cricket) निवृत्ती घेतली होती.

तसेच, मिताली राजने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक भावनिक पोस्ट शेअर करुन निवृत्तीची घोषणा केली आहे. मिताली राजने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "मी लहान मुलीच्या रुपात निळी जर्सी परिधान करुन भारताच्या प्रवासाला निघाले, कारण आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हा सर्वोच्च सन्मान आहे. या प्रवासात अनेक चढउतार मी पाहिले. प्रत्येक घटनेने मला काहीतरी शिकवले. गेली 23 वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वात परिपूर्ण, आव्हानात्मक आणि आनंददायी आहेत. त्यामुळे सर्व प्रवासाप्रमाणेच या प्रवासाचाही अंत झाला पाहिजे."

तिने पुढे लिहिले की, "आजच्या दिवशी मी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेत आहे. प्रत्येक वेळी मी मैदानात उतरले, तेव्हा भारताला विजय मिळवून देण्याच्या उद्देशाने मी माझे सर्वोत्तम दिले. तिरंग्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी. या संधीची मी नेहमीच कदर करेन. मला वाटते की, माझ्या कारकिर्दीला पूर्णविराम देण्याची हीच योग्य वेळ आहे. सध्या भारतीय महिला संघ काही अतिशय प्रतिभावान युवा खेळाडूंच्या हातात आहे. भारतीय क्रिकेटचे भविष्य उज्ज्वल आहे."

मितालीने पुढे बीसीसीआयसह इतरांचेही आभार मानत लिहिले, "मी बीसीसीआय (BCCI) आणि जय शाह सर (Honorary Secretary, BCCI) यांचे आभार मानते. प्रथम एक खेळाडू म्हणून आणि नंतर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार म्हणून मला अनेक नव-नवे अनुभव मिळाले. इतकी वर्षे संघाचे नेतृत्व करणे हा सन्मान आहे. याने मला एक व्यक्ती म्हणून निश्चितच आकार दिला. त्यातूनच मला भारतीय महिला क्रिकेटलाही आकार देण्यास मदत झाली."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Borim Accident: बोरी येथे भीषण अपघात! काँक्रिटवाहू ट्रकची कारला जोरदार धडक, 4 मुलांसह 6 जण गंभीर जखमी

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

SCROLL FOR NEXT