Delhi Capitals Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: दिल्ली कॅपिटल्सला पहिल्या विजयानंतर मोठा झटका, मिचेल मार्श दुखापतग्रस्त

अष्टपैलू मिचेल मार्श (Mitchell Marsh) हिपच्या दुखापतीने त्रस्त असून तो पाकिस्तानविरुद्धची वनडे आणि टी-20 मालिका खेळणार नसल्याचे बोलले जात आहे.

दैनिक गोमन्तक

आयपीएल 2022 (IPL 2022) च्या 15 व्या मोसमात दिल्ली कॅपिटल्सने आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात दिल्लीने पाच वेळच्या विजेत्या असणाऱ्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) रोमहर्षक पद्धतीने पराभव केला आहे. दिल्लीने 178 धावांचे लक्ष्य 18.2 षटकांत पूर्ण केले. मात्र, या विजयानंतर दिल्ली कॅपिटल्ससाठी (Delhi Capitals) धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा एक खेळाडू जखमी झाला आहे. अष्टपैलू मिचेल मार्श (Mitchell Marsh) हिपच्या दुखापतीने त्रस्त असून तो पाकिस्तानविरुद्धची (Pakistan) वनडे आणि टी-20 मालिका खेळणार नसल्याचे बोलले जात आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने मिचेल मार्शच्या दुखापतीबाबत माहिती दिली आहे.

अ‍ॅरॉन फिंच म्हणाला, 'मिचेल मार्शच्या हिपला दुखापत झाली आहे. त्याला ज्याप्रकारे वेदना होत आहेत, त्यामुळे तो पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळेल असे वाटत नाही.' मिशेल मार्शची ही दुखापत केवळ ऑस्ट्रेलियासाठीच (Australia) नाही तर दिल्लीसाठीही डोकेदुखी ठरली आहे. कॅपिटल्सलाही मोठा धक्का बसला असून हा खेळाडू फ्रँचायझीसाठी महत्त्वाचा असल्याचे मानले जात आहे.

मिचेल मार्श पुन्हा जखमी झाला

मिचेल मार्शला दिल्ली कॅपिटल्सने 6.50 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. मार्शचा उत्कृष्ट फॉर्म पाहता दिल्लीने त्याला आपल्या संघात घेतले. मात्र आता मार्शच्या दुखापतीमुळे दिल्लीला टेन्शन आले आहे. मिचेल मार्शला दुखापतीतून सावरण्यासाठी किती वेळ लागेल, हे अद्याप समजू शकलेले नाही. त्याला ज्या प्रकारची दुखापत झाली आहे, त्यावरुन त्याला सावरण्यासाठी किमान 2 ते 3 आठवडे लागू शकतात, असे झाल्यास मिचेल मार्श दिल्ली कॅपिटल्ससाठी निम्म्याहून अधिक सामना खेळू शकणार नाही.

दरम्यान, मिचेल मार्शच्या दुखापतींचा मोठा इतिहास आहे. 2017 मध्ये कमरेला झालेल्या दुखापतीमुळे रायझिंग पुणे सुपरजायंट संघातून मार्शला बाहेर पडावे लागले होते. यानंतर पुढील चार वर्षांत मार्शच्या खांद्यावर आणि घोट्यावरही शस्त्रक्रिया झाली. 2020 मध्ये आरसीबीत दाखल झालेला मार्श सामन्याआधीच जखमी झाला होता. त्यानंतर त्याने आयपीएलमधून सुट्टी घेतली होती. यातच आता मार्श पुन्हा एकदा जखमी झाला आहे.

मिचेल मार्शचा शानदार फॉर्म

मिचेल मार्शने अलीकडेच बिग बॅश लीगमध्ये 85 च्या सरासरीने 255 धावा केल्या आहेत. T20 विश्वचषकात मार्शने 60 पेक्षा जास्त सरासरीने 185 धावा केल्या. दोन्ही स्पर्धांमध्ये मार्शने आपल्या संघाला चॅम्पियन बनवले होते. यामुळेच दिल्लीने त्याच्यावर मोठा सट्टा लावला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT