Mitchell Marsh dropped catch of Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS Video: मार्शने कॅच सोडला अन ऑस्ट्रेलियाने मॅच गमावली! सामन्याला कलाटणी देणारा तो क्षण एकदा पाहाच

Marsh dropped catch: वर्ल्डकप 2023 मध्ये भारत - ऑस्ट्रेलिया सामन्यात मार्शने विराटचा सुटलेला झेल कलाटणी देणारा ठरला.

Pranali Kodre

Mitchell Marsh dropped catch of Virat Kohli turning point of ICC ODI Cricket World Cup 2023 India vs Australia Match:

'कॅच घ्या अन् मॅच जिंका', असे क्रिकेटमध्ये अनेकदा म्हटले जाते. याचा प्रत्यय वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत रविवारी झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यानही आला. या सामन्यातील विराट कोहलीचा एक सुटलेला झेल ऑस्ट्रेलियाला चांगलाच महागात पडला. हा सुटलेला झेल सामन्याला कलाटणी देणाराही ठरला.

चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवत आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. भारताच्या विजयात विराट कोहली आणि केएल राहुल यांनी मोलाचा वाटा उचलला. दरम्यान, विराट कोहलीला 8 व्या षटकात जीवदान मिळाले होते.

झाले असे भारतीय संघाकडून विराट आणि केएल राहुल ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 200 धावांचा पाठलाग करत असताना 8 व्या षटकात जोश हेजलवूड गोलंदाजी करत होता. त्यावेळी भारताने आधी 3 विकेट्स गमावल्या होत्या आणि भारताच्या केवळ 20 धावा झाल्या होत्या. हेजलवूडने या षटकात टाकलेल्या पहिल्या दोन्ही चेंडूवर एकही धाव निघाली नव्हती.

त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर मात्र, त्याने विराटला चूक करण्यात भाग पाडले. तिसरा चेंडू विराटच्या बॅटला लागून हवेत गेला. यावेळी मिचेल मार्श मिड-विकेटवरून पळत येत होता आणि यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरेही फॉरवर्डला पळत येत होता. यावेळी मार्शने झेल घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्याकडून हा झेल सुटला आणि विराटला 12 धावांवर जीवदान मिळाले.

विराटनेही नंतर या जीवदानाचा फायदा घेतला आणि केएल राहुलबरोबर चौथ्या विकेटसाठी 165 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. महत्त्वाचे म्हणजे भारताने दोन षटकातच 2 धावांवर 3 विकेट्स गमावल्या होत्या, त्यानंतर त्यांची केलेली ही भागीदारी भारतासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली.

जर, मार्शने विराटचा तो झेल पकडला असता, तर भारतीय संघ अजून संकटात सापडला असता आणि कदाचीत सामनाही दबावाच्या परिस्थितीत भारताच्या हातून निसटू शकत होता. त्याचमुळे विराटचा सुटलेला झेल हा सामन्याला वळण देणारा ठरला. विराटने नंतर 116 चेंडूत 86 धावांची खेळी केली.

त्याला नंतर 38 व्या षटकात हेजलवूडनेच बाद केले, पण तोपर्यंत भारतीय संघासाठी विजयाचा मार्ग सुकर झाला होता. उर्वरित लक्ष्य केएल राहुलने हार्दिक पंड्याला साथील घेत पूर्ण केले आणि भारताला विजय मिळवून दिला. केएल राहुल 97 धावांवर नाबाद राहिला. भारताने 200 धावांच्या आव्हानाचा पाठलाग 41.2 षटकात पूर्ण केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT