Nitu Ghanghas
Nitu Ghanghas Dainik Gomantak
क्रीडा

Womens World Boxing Championship: केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नीतू घंघासचे केले अभिनंदन, म्हणाले...

Manish Jadhav

Hardeep Singh Puri On Nitu Ghanghas: केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नीतू घंघासने महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल ट्विट केले.

वास्तविक, केंद्रीय मंत्र्यांनी ट्विट करुन सुवर्णपदक जिंकल्याबद्दल नीतू घंघासचे अभिनंदन केले आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, भारताच्या नीतू घंघासने महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. या चॅम्पियनचे खूप खूप अभिनंदन... मात्र, केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे.

दरम्यान, भारतीय बॉक्सर नीतू घंघासने महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. घंघासने 48 किलो वजनी गटात मंगोलियाच्या लुत्सेखान अल्टेंगसेंगचा पराभव केला.

भारतीय बॉक्सरने हा सामना 5-0 असा जिंकला. तत्पूर्वी, शनिवारी घंघासने उपांत्य फेरीच्या सामन्यात कझाकिस्तानच्या बॉक्सरचा पराभव केला. त्याचबरोबर या दिवशी भारताच्या (India) खात्यात आणखी एक सुवर्णपदक येऊ शकते.

रविवारी सर्वांच्या नजरा या बॉक्सर्सवर असतील.

निकहत जरीन आणि लोव्हलिना बोरहगेन यांनीही महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

निकहत जरीन आणि लोव्हलिना बोरहगेन 26 मार्च रोजी अंतिम फेरीत भिडतील. अशा प्रकारे, 4 भारतीय बॉक्सर महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करु शकले.

या खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावले आहे

मेरी कोम (Mary Kom) (2002, 2005, 2006, 2008, 2010 आणि 2018), सरिता देवी (2006), जेनी आरएल (2006), लेखा केसी (2006), आणि निखत जरीन (2022) नंतर अशी कामगिरी करणारी ती सहावी भारतीय खेळाडू ठरली आहे.

नीतूसह भारताच्या इतर तीन स्टार बॉक्सर्सनीही या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. निखत जरीनने (50 किलो) रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या कोलंबियाच्या इंग्रिड व्हॅलेन्सियाचा 5-0 असा पराभव केला तर लोव्हलिना बोर्गोहेनने (75 किलो) चीनच्या ली कियानचा 4-1 असा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला.

तर स्वीटी बूरा (81 किलो) हिने ऑस्ट्रेलियाच्या स्यू-एम्मा ग्रीनट्रीचा 4-3 असा पराभव करुन तिची दुसरी जागतिक स्पर्धा गाठली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT