Michelle Castana is only Goan player in indian women's football team Dainik Gomantak
क्रीडा

महिला फुटबॉल संघात मिशेल एकमेव गोमंतकीय

कुडतरी येथे जन्मलेली मिशेल 28 वर्षांची आहे. 2018 साली तिने भारतीय महिला फुटबॉल संघातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.

दैनिक गोमन्तक

पणजी: भारतीय महिला फुटबॉल संघाच्या (Indian women's football team) आगामी मैत्रीपूर्ण लढतींसाठी मुख्य प्रशिक्षक थॉमस डेनेर्बी यांनी 23 सदस्यीय संघ जाहीर केला आहे, त्याच बचावपटू मिशेल कास्ताना(Michelle Castana) एकमेव गोमंतकीय (Goa) आहे.

भारतीय संघ सध्या जमशेदपूर येथे सराव करत असून बुधवारी नवी दिल्लीस रवाना होईल. तेथून संयुक्त अरब अमिराती येथे संघ जाणार असून तेथे दोन सामने खेळेल. यजमान संघाविरुद्ध दोन ऑक्टोबर रोजी, तर ट्युनिशियाविरुद्ध चार ऑक्टोबर रोजी सामना होईल. नंतर भारतीय संघ बहारीनला जाणार असून तेथे आणखी दोन सामने खेळेल. यजमान बहारीनविरुद्ध 10 ऑक्टोबरला, तर तैवानविरुद्ध 13 ऑक्टोबरला सामना खेळला जाईल.

चमकदार कारकीर्द

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या महिला फुटबॉल लीग स्पर्धेत मिशेल गोकुळम केरळा संघातर्फे खेळते. तिच्या नेतृत्वाखाली या संघाने 2020 मध्ये ही स्पर्धा जिंकली, तर 2019 साली उपविजेते ठरले. गोकुळम केरळा संघ नोव्हेंबरमध्ये एएफसी महिला क्लब स्पर्धेत खेळेल. चौथ्या महिला लीग स्पर्धेनंतर मिशेलला कोविड-19 मुळे इनडोअर सराव करावा लागला. मध्यंतरी तिच्या गुडघ्याला दुखापत झाली, त्यामुळे उझबेकिस्तान व बेलारूसविरुद्धच्या मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय फुटबॉल लढतीत ती खेळू शकली नव्हती. आता तिने राष्ट्रीय संघात पुनरागमन केले आहे. यापूर्वी तिने गोवा फुटबॉल असोसिएशनच्या महिला लीग स्पर्धेतही चमकदार खेळ केलेला आहे. राज्य पातळीवर ती साळगावकर एफसी, पणजी फुटबॉलर्स, चर्चिल ब्रदर्स या संघातर्फे खेळली आहे.

नियमित खेळाडू

कुडतरी येथे जन्मलेली मिशेल 28 वर्षांची आहे. 2018 साली तिने भारतीय महिला संघातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तेव्हापासून ती संघातील नियमित सदस्य आहे. 2019 साली भारतीय महिला संघाने सॅफ करंडक स्पर्धा, तसेच दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत विजेतेपद मिळविले. दोन्ही वेळेस मिशेलचा विजयी संघात समावेश होता. याशिवाय तिने आशियाई महिला कप पात्रता, स्पेनमधील कॉटिफ कप, ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT