क्रिकेट इतिहासात (Cricket History) असे फार कमी गोलंदाज आहेत ज्यांच्या दुर्मिळ ची गोलंदाजीची चर्चा होते. मग तो श्रीलंकेचा मलिंगा असो, दक्षिण आफ्रिकेचा पॉल अॅडम्स असो किंवा भारताचा जसप्रीत बुमराह आणि शिविल कौशिक असो. या सर्व गोलंदाजांची गोलंदाजी विलक्षण असते जी क्रिकेटप्रेमिंना प्रभावित करते. (Michael Vaughan discover Goli bowler of film lagaan)
अलीकडेच श्रीलंकेचा मथिशा पाथिराना देखील चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे कारण त्याची गोलंदाजी देखील लसिथ मलिंगासारखीच आहे. या गोलंदाजांनी क्रिकेट चाहत्यांच्या मनावर अमिट छाप सोडली आहे. क्रिकेटच्या इतिहासात जेव्हा जेव्हा अॅक्शनबाज गोलंदाजी अॅक्शनची चर्चा होते तेव्हा या सर्व गोलंदाजांचे नाव पहिल्या फळीत असते.
दरम्यान, सोशल मीडियावर एक विचित्र गोलंदाजी अॅक्शनचा व्हिडिओ खूप वेगाने शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ इंग्लंडचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज मायकल वॉनने त्याच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. ज्यामध्ये एक गोलंदाज गोलंदाजी करताना 7 ते 8 वेळा हात फिरवताना दिसत आहे. ज्याची तुलना लगन चित्रपटातील 'गोली बॉलर'सोबत केली जात आहे.
मायकेल वॉनने शेअर केला दुर्मिळ व्हिडिओ
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने फ्रीलान्स समालोचक चार्ल्स डुगनेलचा व्हिडिओ शेअर करताना 'परफेक्ट अॅक्शन' म्हणजेच सर्वात अचूक अॅक्शन असलेली गोलंदाजी असे कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिले आहे. वॉनने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक गोलंदाज अतिशय विचित्र पद्धतीने गोलंदाजी करत आहे, तो आंतरराष्ट्रीय सामन्याचा नसून स्थानिक सामन्याचा व्हिडिओ असल्याचे दिसत आहे.
व्हिडिओने गोली बॉलरच्या आठवणींना दिला उजाळा
या व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की, या बॉलरची अॅक्शन हुबेहुब आमिर खानच्या 'लगान' चित्रपटातील 'गोली बॉलर'सारखी आहे. लगान या चित्रपटातही गोली बॉलर बॉल फेकताना अनेक वेळा हात फिरवतो आणि नंतर जाऊन बॉल फेकतो. त्याचा फायदा त्याला मिळतो आणि तो विकेट घेण्यातही यशस्वी होतो. सोशल मीडियावर क्रिकेट चाहते हा व्हिडिओ खूप शेअर आणि लाईक करताना दिसत आहेत. क्रिकेट चाहते या व्हिडिओची 'लगान' चित्रपटातील 'गोली बॉलर'शी तुलना करत मजेदार कमेंट्स लिहित आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.