Lionel Messi and Cristiano Ronaldo Dainik Gomantak
क्रीडा

Lionel Messi: वर्ल्डकप विजयानंतर मेस्सीचं इंस्टाग्रामवरील वजन वाढलं, आता टाकणार रोनाल्डोला मागे?

मेस्सी आणि रोनाल्डो इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोवर्स असणारे खेळाडू आहेत.

Pranali Kodre

Instagram Highest Earners: ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनल मेस्सी हे जगातील लोकप्रिय खेळाडूंपैकी आहेत. सोशल मीडियावरही त्यांना मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोइंग आहे. सध्या रोनाल्डो इंस्टाग्रावरून सर्वाधिक फॉलोवर्स असणारा आणि सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू आहे. पण आता त्याला लवकरच मेस्सी सर्वाधिक कमाई करण्याबाबत मागे टाकू शकतो.

सध्या रोनाल्डोने साल 2022 मध्ये त्याच्या एका ब्रँड पोस्टसाठी 2 मिलियन पाउंड म्हणजेच साधारण 19.69 कोटी रुपये घेतले होते. तसेच मेस्सीने 2022 वर्षात एका ब्रँड पोस्टसाठी 1.5 मिलियन पाउंड म्हणजेच 14.77 कोटी रुपये घेतले होते.

पण, आता मेस्सीची ब्रँड व्हॅल्यू वाढल्याचे दिसत आहे. मेस्सीने डिसेंबर 2022 फिफा वर्ल्डकप जिंकला होता. त्याच्याच नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने हा वर्ल्डकप जिंकला. विशेष म्हणजे त्याला या वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही मिळाला होता. यानंतर आता मेस्सीने प्रायोजकांना आकर्षित केले आहे.

गेल्या तीन आठवड्यात मेस्सीने इंस्टाग्रामवर विविध ब्रँडिंगच्या पोस्ट केल्या आहेत. त्यामुळे तो करत असलेल्या पोस्ट पाहाता तो यातून यावर्षी मोठ्या प्रमाणात कमाई करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, रोनाल्डोनेही नुकतेच अल-नासर क्लबबरोबर जवळपास 200 मिलियनचा करार केला आहे. त्यामुळे कमाईच्या बाबतीत रोनाल्डो मागे नाही. मात्र सोशल मीडियावर मेस्सी त्याला यावर्षी मागे टाकू शकतो.

सध्या इंस्टाग्रामवर रोनाल्डोला 530 मिलियन फॉलोवर्स आहेत, तर मेस्सीला 415 मिलियन फॉलोवर्स आहेत. तसेच काही दिवसांपूर्वीच मेस्सीने शेअर केलेला वर्ल्डकप उंचावतानाचा त्याचा फोटो इंस्टाग्रामवर सर्वाधिक लाईक्स मिळालेला फोटो ठरला होता. मेस्सीच्या या फोटोला 74 मिलियनपेक्षाही अधिक लाईक्स आल्या आहेत.

दरम्यान भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली इंस्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर असून तो एका ब्रँड पोस्टसाठी 902,000 पाउंड्स म्हणजेच 8.88 कोटी रुपये घेतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: गोव्याविरुद्धच्या रणजी सामन्यापूर्वी बिहार संघात मोठी उलथापालथ! सकिबुल गनीकडून कर्णधारपद काढून घेतलं, मंगल महरौर करणार नेतृत्व

India U19 Cricket: गोव्याच्या चिगुरुपती व्यंकटची टीम इंडियात एंट्री; आशिया कपसाठी मिळाली संधी

Panaji Market: वास्कोच्या आगीनंतर पणजी महापालिका सतर्क; खाद्यपदार्थ बनविणाऱ्या दुकानाला ठोकले टाळे

अविवाहित असल्याचं भासवून लग्नाचं आमिष दाखवलं... लैंगिक शोषण प्रकरणात संशयिताला दिलासा नाही, अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळला

River Pollution: साळ नदीच्या प्रदूषणाला बेकायदेशीर घरे कारणीभूत? सरपंच डिक्सन वाझ यांचा आरोप

SCROLL FOR NEXT