Argentina | FIFA World Cup 2022 | Lionel Messi  Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup 2022: मेस्सीच्या मॅजिकने अर्जेंटिना जगज्जेता! विजेतेपद मिळवताच आनंदाश्रू अनावर; Video

फिफा वर्ल्डकप 2022 चे विजेतेपद जिंकताच अर्जेंटिनाच्या खेळाडूंना अश्रू अनावर झाले

Pranali Kodre

FIFA World Cup 2022: फिफा फुटबॉल वर्ल्डकप २०२२ स्पर्धेच्या विजयाची माळ लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाच्या गळ्यात पडली. अंतिम सामन्यात पेनल्टी शुटआऊटमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सवर ४-२ च्या गोलफरकाने विजय मिळवला. हा विजय मिळवताच अर्जेंटिनाच्या खेळाडूंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहिले.

हा वर्ल्डकप मेस्सीच्या कारकिर्दीतील अखेरचा वर्ल्डकप होता. त्याने आत्तापर्यंत ५ वर्ल्डकप खेळले आहेत आणि अखेर त्याने पाचवा वर्ल्डकप खेळताना अर्जेंटिनाला वर्ल्डकप विजयाची ट्रॉफी मिळवून दिली. त्यामुळे त्यालाही आनंदाश्रू अनावर झाले होते. त्याचे कुटुंबिय देखील सामना पूर्ण झाल्यानंतर मैदानावर आले होते.

या भावनिक क्षणांचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मेस्सीने अर्जेंटिनाकडून अंतिम सामन्यात दोन गोल केले, तर पेनल्टी शुटआऊटमध्ये पहिला गोलही त्यानेच केला. त्याने सामन्याच्या 23 व्या मिनिटालाच गोल करत अर्जेंटिनाला खाते उघडून दिले होते. त्यानंतर अर्जेंटिनाकडून पहिल्या हाफमध्ये एंजेल डी मारियाने दुसरा गोल करत आघाडी मिळवून दिली होती.

मात्र, फ्रान्सच्या एमबाप्पेने दुसरा हाफ संपण्यास १० मिनिटे असतानाच लागोपाठ दोन गोल करत बरोबरी साधून दिली. अखेर हा सामना ज्यादाच्या वेळेत गेला. त्यात मेस्सी आणि एमबाप्पेने पुन्हा एकदा आपापल्या संघांसाठी प्रत्येकी एक गोल केला. त्यामुळे सामन्याचा निकाल पेनल्टी शुटआऊटमध्ये गेला.

पेनल्टी शुटआऊटमध्ये अर्जेंटिनाकडून मेस्सी, डायबाला, पॅरेडेस आणि माँटिएल यांनी गोल केले, तर फ्रान्सकडून केवळ एमबाप्पे आणि कॉलो मुआनीला गोल करता आला. त्यामुळे अर्जेंटिनाने विजयावर शिक्कामोर्तब केले.

त्यामुळे मेस्सी आता एका वर्ल्डकपमध्ये साखळी फेरी, उपउपांत्यपूर्व, उपांत्यपूर्व, उपांत्य फेरीत आणि अंतिम सामन्यात गोल करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये महिलेचं लाजिरवाणं कृत्य; 5 तास सुरू होता प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

ओळखणंही झालं कठीण! WWE दिग्गज John Cenaचा धक्कादायक लूक; फोटो पाहून चाहतेही अवाक्!

Ardh Kendra Yog 2026: बँक बॅलन्स वाढणार, सगळ्या चिंता मिटणार! 'अर्धकेंद्र योग' बदलणार 5 राशींचे भाग्य; धनाचा होणार वर्षाव

Bicholim Heavy Rain: डिचोलीत पावसाचा पुन्हा तडाखा; दोन ठिकाणी झाडे कोसळली

Indus Waters Treaty Row: "...तर हात कापून टाकू!" सिंधु जल करारावरुन पाकिस्तानी मंत्र्यांचा जळफळाट; दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकड्यांची भारताविरोधात आगपाखड

SCROLL FOR NEXT