India vs Australia | Memes Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: पहिले पाढे पंचावन्न! टीम इंडियाने 2 धावांत 3 विकेट्स गमावल्यानंतर मीम्सचा महापूर

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Australia, Memes Viral:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत पाचवा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात रविवारी झाला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर 200 धावांचे आव्हान ठेवले आहे. पण भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 200 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्मा आणि इशान किशन फलंदाजीला आले होते. मात्र पहिल्याच षटकात इशान किशनला मिचेल स्टार्कने कॅमेरॉन ग्रीनच्या हातून झेलबाद केले.

यानंतरही धावा काढण्यासाठी संघर्ष करणारा रोहित शर्माही दुसऱ्याच षटकात 6 चेंडू खेळून शुन्यावर बाद झाला. त्याला जोश हेजलवूडने पायचीत केले. रोहितने यावर रिव्ह्यू घेतला होता. मात्र, अंपायर्स कॉस असा रिव्ह्यूचा निकाल असल्याने रोहितला माघारी जावे लागले.

दुसऱ्याच षटकात हेजलवूजने श्रेयस अय्यरलाही शुन्यावर डेव्हिड वॉर्नरच्या हातून झेलबाद केले. त्यामुळे भारताची अवस्था 2 षटकात 3 बाद 2 धावा अशी दयनीय झाली होती. मात्र, यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी अर्धशतकी भागीदारी केली.

मात्र, भारताने पहिल्या दोनच षटकात विकेट्स गमावल्याने अनेक सोशल मीडिया युजर्सने भन्नाट मीम्स शेअर केले आहेत. त्याचबरोबर अनेक चाहत्यांना 2019 वर्ल्डकपचा भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा उपांत्य सामना आठवला.

त्या सामन्यातही 240 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 4 षटकांच्या आत 5 धावांवर 3 विकेट्स गमावल्या होत्या. त्यावेळी केएल राहुल, विराट कोहली आणि रोहित शर्मा प्रत्येकी 1 धावेवर बाद झाले होते.

दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 46 धावांची खेळी केली, तसेच डेव्हिड वॉर्नरने 41 धावांची खेळी केली.

याबरोबरच मिचेल स्टार्कने 28 धावांची खेळी केली. पण बाकी कोणाला 20 धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 49.3 षटकात 199 धावांवर सर्वबाद झाला.

भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

SCROLL FOR NEXT