MS Dhoni Run Out | World Cup 2019 ICC
क्रीडा

MS Dhoni: धोनीच्या 2019 वर्ल्डकपमधील रनआऊटनंतर काय झालं? चार वर्षांनंतर गप्टीलचं मोठं भाष्य

Martin Guptill: चार वर्षांनंतर गप्टीलने धोनीला वर्ल्डकप 2019 सेमीफायनलमध्ये केलेल्या रनआऊटवर भाष्य केलं आहे.

Pranali Kodre

Martin Guptill opened up on MS Dhoni Run-out in World Cup 2019 Semi-Final Match against New Zealand:

भारतीय क्रिकेटप्रेमी आजही 2019 वनडे वर्ल्डकपमधील भारत आणि न्यूझीलंड संघातील उपांत्य फेरीचा सामना विसरलेले नाही. पावसामुळे राखीव दिवशी या सामन्याचा निकाल लागला होता आणि भारताला अवघ्या 18 धावांनी पराभूत झाला होता.

याच सामन्यात भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला मार्टिन गप्टीलने धावबाद केले, आता याच धावबादबद्दल गप्टीलने प्रतिक्रिया दिली आहे.

हा सामना मँचेस्टरमध्ये झाला होता. या सामन्यात भारताने 240 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 5 धावांवरच 3 विकेट्स गमावल्या होत्या. तसेच 92 धावांवर 6 विकेट्स गमावल्या होत्या. पण, भारताकडून 7 व्या विकेटसाठी एमएस धोनी आणि रविंद्र जडेजा यांनी 7 व्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी करत भारताच्या विजयाचा आशा उंचावल्या होत्या.

मात्र, 48 षटकात जडेजा 77 धावांवर बाद झाला, तसेच धोनी 50 धावांवर असताना मार्टिन गप्टीनच्या डायरेक्ट थ्रोवर धावबाद झाला. त्यानंतर भारताच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या आणि भारतीय संघ 49.3 षटकात 221 धावातच सर्वबाद झाला होता.

या सामन्यात धोनीचे धावबाद सामन्याला वळण देणारे ठरले होते. त्यामुळे या सामन्यानंतरही अनेकदा भारतीय क्रिकेट चाहत्यांकडून गप्टीलला कठोर बोल ऐकावे लागले होते.

याबद्दल गप्टील हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना म्हणाला, 'ती अशी गोष्ट होती, जी क्षणात झाली होती. मला आठवते की मी चेंडूला वर उडालेला पाहिला आणि मग मी विचार केला, तो चेंडू सरळ माझ्याकडेच येत होता. म्हणून मी जोरात पळालो.'

'मला माहित होते की स्टंपवर थ्रो करण्याची कोणतीही संधी नाही, पण मी फक्त एक प्रयत्न केला आणि निशाणा लावायला माझ्याकडे केवळ दीड स्टंप होता. मी भाग्यशाली होतो की हा एकदम परिपूर्ण थ्रो होता.'

त्यानंतर हा क्षण भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मात्र धक्कादायक होता, असे म्हटल्यानंतर गप्टील हसून म्हणाला, 'दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले, तर संपूर्ण भारत माझा तिरस्कार करतो. मला येथून खूप तिरस्काराचे मेल येत असतात.'

दरम्यान, हा सामना धोनीचा अखेरचा सामना ठरला. या सामन्यानंतर भारताचेही या वर्ल्डकपमधील आव्हान संपले होते. तसेच 2022 नंतर गप्टीलही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT