Marnus Labuschagne AFP
क्रीडा

AUS vs PAK, Video: कबुतर जा जा! स्मिथने तक्रार करताच लॅब्युशेनने उडवलं पक्ष्यांना, पाकिस्तानी बॉलरचीही मदत

Marnus Labuschagne: पाकिस्तानविरुद्ध सुरु असलेल्या मेलबर्न कसोटीदरम्यान ऑस्ट्रेलियाचा फलंदाज लॅब्युशेन कबुतरांना हुसकावताना दिसला होता.

Pranali Kodre

Marnus Labuschagne chased down the pigeons to clear field During Australia vs Pakistan Melbourne Test :

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर मंगळवारपासून (26 डिसेंबर) सुरू झाला आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी एक गमतीशीर घटना घडल्याचे दिसले.

या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लॅब्युशेन कबुतरांना हुसकावताना दिसला होता, याचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

खरंतर मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर कबुतरांची उपस्थिती ही नवीन गोष्ट नाही, तिथे बऱ्याचदा कबुतरे येत असतात.

मात्र, मंगळवारी प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅब्युशेन फलंदाजी करत असताना कबुतरे अंपायच्या मागच्या बाजूला मैदानात येऊन बसली. यावेळी फलंदाजी करताना लक्ष विचलित होत असल्याचे स्मिथ म्हणत होता.

यावेळी लॅब्युशेनने यात स्वत:च लक्ष घातले आणि त्याने बॅट फिरवत कबुतरांना तेथून हुसकावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कबुतरे उडून दुसरीकडे गेली. त्यानंतर पाकिस्तानचा गोलंदाज हसन अलीही कबुतरांना हुसकावताना दिसला. या घटना पाहून स्मिथलाही हसू आवरले नाही. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 96.5 षटकात 318 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून लॅब्युशेनने सर्वाधिक 63 धावांती खेळी केली. तसेच मिचेल मार्शने 41 धावा केल्या, तर उस्मान ख्वाजाने 42 धावांची खेळी केली. याबरोबरच डेव्हिड वॉर्नरने 38 धावांची, स्टीव्ह स्मिथने 26 धावांची छोटेखानी खेळी केली.

पाकिस्तानकडून या डावात अमीर जामेलने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर शाहिन आफ्रिदी, मीर हामझा आणि हसन अली यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर अघा सलमानने 1 विकेट घेतली.

त्यानंतर दुसऱ्या दिवसाखेर पाकिस्तानने पहिल्या डावात 55 षटकात 6 बाद 194 धावा केल्या असून अद्याप ते 124 धावांची पिछाडीवर आहेत.

पाकिस्तानकडून अब्दुल्ला शफिकने सर्वाधिक 62 धावांची खेळी केली, तर कर्णधार शान मसूदने 54 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने 3 विकेट्स घेतल्या, तर नॅथन लायनने 2 विकेट्स घेतल्या आणि जोश हेजलवूडने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli Viral Post: विराट कोहलीचा दोन वर्षांनंतर मोठा निर्णय; सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टनं खळबळ!

Mandovi Bridge: मांडवी पुलावर 'नो एन्ट्री'! 11 जानेवारीला 'या' वेळेत नव्या आणि जुन्या पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद

Raia Fire News: ..आणि बघता बघता डोंगरच पेटला! राय येथील घटना; अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न

Tara Sutaria Breakup: तारा सुतारिया आणि वीर पहाडियाचे ब्रेकअप? 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर नात्यात दुरावा Watch Video

Goa Nature Conference 2026: निसर्गाशी नाते करा घट्ट! गोव्यात रंगणार पहिले निसर्ग संमेलन; तारीख, वेळ जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT