Manoj Tiwary

 

Dainik Gomantak 

क्रीडा

Ranji Trophy: 'या' रणजी संघात क्रीडामंत्र्यांना मिळाले स्थान !

बंगालने रणजी ट्रॉफी 2022 साठी आपला संघ जाहीर केला आहे. 21 सदस्यीय संघात अनुभवी फलंदाज मनोज तिवारीच्या (Manoj Tiwary) नावाचाही समावेश आहे.

दैनिक गोमन्तक

बंगालने रणजी ट्रॉफी 2022 साठी आपला संघ जाहीर केला आहे. 21 सदस्यीय संघात अनुभवी फलंदाज मनोज तिवारीच्या नावाचाही समावेश आहे. तिवारी हे सध्या बंगालचे क्रीडा आणि व्यवहार मंत्री आहेत. 2021 मध्ये, त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) वतीने शिवपूर मतदारसंघातून बंगाल विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली होती. त्यांनी भाजपच्या (BJP) रथीन चक्रवर्ती (Rathin Chakraborty) यांचा पराभव केला होता. त्यानंतर मनोज तिवारीने (Manoj Tiwary) राजकारणात येण्यासाठी क्रिकेटपासून फारकत घेतली होती. मात्र आता तो पुन्हा क्रिकेटच्या मैदानात परतणार असल्याची चाहूल लागली आहे. 36 वर्षीय मनोज तिवारी बंगालच्या संघाचा कर्णधारही राहिला आहे. हे त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 17 वे वर्ष असेल. मार्च 2020 मध्ये सौराष्ट्रविरुद्ध रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) फायनलमध्ये तो शेवटचा खेळला होता. यानंतर तो दुखापतीमुळे उर्वरित मोसमापासून दूर राहीला होता.

दरम्यान, अभिमन्यू इसवरनला बंगालचा कर्णधार बनवण्यात आले आहे. हा संघ ब गटात आहे. इथे त्याच्यासोबत विदर्भ, राजस्थान, केरळ, हरियाणा, त्रिपुरा हे प्रतिस्पर्धी संघ आहेत. बंगालचा पहिला सामना 13 जानेवारीपासून बेंगळुरुमध्ये त्रिपुरासोबत होणार आहे. टूर्नामेंट सुरु होण्यापूर्वी कोरोनामुळे बंगालच्या तयारीवर परिणाम झाला आहे. संघातील सहा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यासोबतच संघाचे सहाय्यक प्रशिक्षकही या मोहिमेत आहेत. या सर्व चाचणीचे निकाल 2 जानेवारी रोजी आले. तेव्हापासून सर्वजण अलिप्त आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या खेळाडूंमध्ये सुदीप चॅटर्जी, अनुष्टुप मजुमदार, काझी जुनैद सैफी, गीत पुरी आणि प्रदीप्ता प्रामाणिक यांचा समावेश आहे. हे सर्वजण बंगालच्या 21 जणांच्या रणजी संघाचाही भाग आहेत.

बंगालमध्ये स्थानिक स्पर्धा थांबल्या

रणजी मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी बंगाल 6-7 जानेवारीला मुंबईविरुद्ध दोन दिवसीय सराव सामना खेळणार आहे. मुंबईचा संघ पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. या सामन्यानंतर बंगालचा संघ बेंगळुरुला रवाना होईल. अरुण लाल हे बंगालचे मुख्य प्रशिक्षक राहतील. बंगाल क्रिकेट असोसिएशनने कोरोना प्रकरणांमुळे सर्व स्थानिक स्पर्धा थांबवल्या आहेत. तसेच, कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी सर्वोच्च परिषदेची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.

बंगालचा संघ पुढीलप्रमाणे-

अभिमन्य इसवरन (Abhimanya Iswaran) (कर्णधार), मनोज तिवारी, सुदीप चॅटर्जी, अनुष्टुप मजुमदार, अभिषेक रमण, सुदीर घरामी, अभिषेक दास, हृतिक चॅटर्जी, ऋत्विक रॉय चौधरी, अभिषेक पोरेल, शाहबाज अहमद, सायन शेखर, दीपेश कुमार मंडल, पो. काझी जुनैद सैफी, साकीर हबीब गांधी, प्रदीप्ता प्रामाणिक, गीत पुरी, नीलकंता दास आणि करण लाल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: फातोर्ड्यात विरोधकांचा 'एकवट'! विरोधकांचे संघटितपणाचे प्रदर्शन; कॉंग्रेस, गोवा फॉरवर्ड, आरजीपीचे नेते एकत्र

Horoscope: सावधान! प्रेम जीवनात मोठे संकट! वृषभ-मकरसह 'या' 4 राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा

Goa Pollution: नरकासुराच्या नावावर पणजीत धुमाकूळ, वाहनचालकांची धूम; ध्वनी प्रदूषणामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Porvorim Flyover Meeting: परवरी उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाचो घेतलो नियाळ - रोहन खंवटे

IND vs AUS 2nd ODI: रोहित, कोहलीकडून 'विराट' खेळीची अपेक्षा! अ‍ॅडलेडच्या मैदानावर भारताचा रेकॉर्ड कसा? आकडेवारी पाहा

SCROLL FOR NEXT