Manoj Tiwary X/BCCIDomestic
क्रीडा

रणजी ट्रॉफीवर वादग्रस्त विधान करणं मनोज तिवारीला पडलं महागात, BCCI कडून कारवाई; आता म्हणाला, 'खेळाडू IPL केंद्रित...'

Manoj Tiwary Fined by BCCI: मनोज तिवारीने काही दिवसांपूर्वी रणजी ट्रॉफीबद्दल एक पोस्ट शेअर केली होती, त्यावर बीसीसीआयने कारवाई केल्याचे समोर आले आहे.

Pranali Kodre

Manoj Tiwary fined 20% of match fees by BCCI for his remark on Ranji Trophy:

भारताचा माजी फलंदाज मनोज तिवारीने रणजी ट्रॉफीतील बंगालकडून अखेरचा सामना खेळल्यानंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने निवृत्तीच्याच दुसऱ्या दिवशी खुलासा केला की रणजी ट्रॉफीवर टीका केल्याबद्दल त्याच्यावर बीसीसीआयने सामना शुल्काच्या २० टक्के दंड ठोकला होता.

तिवारीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात त्याने लिहिले होते की 'रणजी ट्रॉफीमध्ये काहीतरी चुकीचे होत आहे. पुढच्या हंगामापासून या स्पर्धेला कँलेडरमधून हटवले पाहिजे.'

'ज्या स्पर्धेला समृद्ध इतिहास आहे, त्या स्पर्धेला वाचवण्यासाठी अनेक गोष्टींवर लक्ष देण्याची गरज आहे. या स्पर्धेची आकर्षकता आणि महत्त्व कमी होत आहे. अत्यंत निराशा होत आहे.'

तसेच त्याने एका फेसबुक लाईव्हमध्येही म्हटले होते की निवृत्तीनंतर तो याबाबत अधिक खुलासा करेल. ज्यावेळी तिवारीने ही पोस्ट केलेली त्यावेळी तो खेळत असल्याने सक्रीय खेळाडू होता. त्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली आहे.

दरम्यान, मीडियातील वृत्तानुसार बीसीसीआयने नुकतेच करारबद्ध खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघामधील निवडीसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचे आदेश दिले होते. हा आदेश कदाचित इशान किशनने भारतीय संघाकडून खेळत नसतानाही रणजी ट्रॉफी खेळली नसल्यामुळे देण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

याबाबत मनोज तिवारीने म्हटले आहे की जर त्याने तशी पोस्ट केली नसती, तर बीसीसीआयने असे आदेश कदाचित दिले नसते.

हिंदूस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार मनोज तिवारीने कोलकाता स्पोर्ट्स जर्नालिस्ट क्लबकडून केले गेलेल्या त्याच्या सन्मान सोहळ्यात सांगितले की 'मला वाटते की मी जर एक्सवर (ट्विटर) पोस्ट केले नसते, तर कदाचित बीसीसीआयकडून कोणतेही आदेश दिले गेले नसते. कदाचिद माझ्या पोस्टने बीसीसीआय सचिवांना खेळाडूंना दवाब टाकण्यासाठी प्रेरणा दिली आहे.'

'रणजी ट्रॉफीच्या महत्त्वाच्या टप्प्यात त्यांनी हे पाऊल उचलून जी गंभीरता दाखवली आहे, त्यातून त्यांची चिंता दिसून येते की अनेक खेळाडू विशेषत: हाय प्रोफाईल खेळाडू, ज्यांनी मर्यादीत प्रथम श्रेणी क्रिकेट आणि आयपीएलमध्ये यश मिळवले आहे, ते रणजी ट्रॉफीला पुरेसे महत्त्व देत नाहीत.'

मनोज तिवारी पुढे म्हणाला, 'मी पाहात आहे की अनेक युवा खेळाडूंनी आयपीएल केंद्रीत आपली मानसिकता बनवली आहे. जे खेळाडू आयपीएल खेळत नाहीत, ते रिकाम्या वेळेत दुबई किंवा अन्य ठिकाणी जातात. पण यामुळे प्रतिष्ठीत रणजी ट्रॉफीचे महत्त्व कमी होत आहे.'

'आयपीएल आपल्या सर्वांसाठीच एक मोठा स्टेज आहे, पण मी अशीही विनंती करतो की बीसीसीआय अध्यक्ष आणि सचिव रणजी ट्रॉफीचे महत्त्वा वाढवतील.'

दरम्यान मनोज तिवारीने भारताकडून 12 वनडे आणि 3 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले. त्याने वनडेत एका शतकासह 287 धावा केल्या आणि 5 विकेट्स घेतल्या, तसेच आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये त्याने 15 धावा केल्या.

याशिवाय त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 148 सामने खेळले असून 10195 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 169 लिस्ट ए क्रिकेटमध्ये 5581 धावा केल्या आहेत आणि 63 विकेट्स घेतल्या आहेत.

याशिवाय त्याने 183 टी20 सामने खेळले असून 3436 धावा केल्या आहेत आणि 34 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सुपरस्टार रजनीकांत यांचा 'फर्स्ट क्लास' ऑरा; 'जेलर 2' च्या शूटिंगसाठी गोव्याला रवाना, सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल Watch Video

Goa Tourism: 500 वर्षांपूर्वीचे दगड, पोर्तुगीज कालीन किल्ला, गर्दीपासून दूर 'या' गावाने जपलेय 'पारंपरिक पर्यटन'

IND vs AUS 1st T20: ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला टी-20 सामना रद्द! पुन्हा एकदा पाऊस ठरला व्हिलन; फॉर्ममध्ये परतला कर्णधार 'सूर्या'

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांची चौकशी करा, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मडगावच्या PSI विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

IND vs AUS 1st T20: सर्वात जलद 150 षटकार...! कर्णधार सूर्यकुमार यादवचं धूमशान, तूफानी षटकार ठोकत रोहित शर्माला सोडले मागे; व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT