Mahendra Singh Dhoni Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: धोनी फॅनसाठी आनंदाची बातमी, पुढच्या मोसमातही दिसणार 'माही मॅजिक'

IPL 2023: पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर धोनीने त्याच्या चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली.

Manish Jadhav

IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव करुन पाचव्यांदा IPL ट्रॉफीवर नाव कोरले.

दरम्यान, धोनी पुढील वर्षी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार की नाही असे अनेक प्रश्न सारखे विचारले जात होते. मात्र, यावर आता खुद्द धोनीने मौन सोडले आहे. पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर धोनीने त्याच्या चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली.

पुढील वर्षी पुन्हा आयपीएलमध्ये परतण्याची घोषणा यावेळी धोनीने केली. पुढील 9-10 महिन्यांत फिटनेसवर काम केल्यानंतर आपण पुन्हा मैदानात परतणार असल्याचे त्याने सांगितले.

माहीच्या फॅनसाठी आनंदाची बातमी

वास्तविक, मॅच प्रेझेंटशनदरम्यान हर्षा भोगले यांनी धोनीला विचारले की, 'यावेळी तू तुझा वारसा मागे सोडत आहेस का? त्यावर धोनीने उत्तर दिले की, निवृत्ती जाहीर करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. मला खूप प्रेम मिळाले. परंतु पुढील 9-10 महिने पुन्हा मेहनत करुन आणखी एक हंगाम खेळेन. ही माझ्याकडून भेट असेल.'

चेन्नई पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन बनली

IPL 2023 च्या हाय-स्कोअरिंग अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने सर जडेजाच्या धडाकेबाज कामगिरीमुळे गुजरातचा पाच विकेट्सने पराभव करुन विक्रमी पाचव्यांदा IPL ट्रॉफी जिंकली. जडेजाने शेवटच्या दोन चेंडूत दहा धावा करुन सामना संपवला.

तसेच, या अंतिम सामन्यात आपल्या संघाला त्याने पुन्हा एकदा आयपीएल चॅम्पियन बनवले. याशिवाय, चेन्नईच्या सर्व फलंदाजांनी या महत्त्वाच्या सामन्यात शानदार कामगिरी करत जेतेपदावर कब्जा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

धक्कादायक! 'गोवा सोड अन्यथा..', धमकी देत मारहाण करणाऱ्या 'मगो'च्या नेत्याला अटक

Goa Cabinet: दोन दिवसांत गोवा मंत्रीमंडळात फेरबदल? मुख्यमंत्री सावंतांची दिल्लीत खलबंत, मंत्री-नेत्यांशी भेटीगाठी

Cryptocurrency: ''...तर आज तुम्ही 2450 कोटींचे मालक असता'', बिटकॉइनने गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

IFFI Goa: 'चोला' चित्रपटाला करणी सेनेचा विरोध; भगवे कपडे, तुळस- रुद्राक्षाच्या सीनवर आक्षेप, यॉटवर ज्येष्ठ अभिनेत्यासमोर राडा

Goa Live News: मांद्रेचे माजी सरपंच प्रशांत नाईक यांच्याकडून 350 पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत!

SCROLL FOR NEXT