Ranji Match between Maharashtra vs Tamil Nadu Twitter/@dipakragav
क्रीडा

Ranji Trophy: ऐकावं ते नवलंच! चक्क राखेमुळे थांबला सामना, आर अश्विनच्याही कमेंटने वेधले लक्ष

गुरुवारी रणजी ट्रॉफीतील एका सामन्यात चक्क राखेमुळे व्यत्यय आला होता.

Pranali Kodre

Maharashtra vs Tamil Nadu: क्रिकेटमध्ये अनेकदा सामना अंधूक प्रकाशामुळे, पावसामुळे किंवा खूप वाऱ्यामुळे थांबलेला पाहण्यात आला आहे. पण गुरुवारी रणजी ट्रॉफीमधील तमिळनाडू विरुद्ध महाराष्ट्र संघातील सामना एका वेगळ्याच कारणाने थांबला. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात चक्क राखेमुळे व्यत्यय आला होता.

गुरुवारी या सामन्याचा तिसरा दिवस होता. या दिवसातील खेळ सुरू असताना अचानक राख उडून मैदानाच्या दिशेने यायला लागली. त्यामुळे सामना साधारण २० मिनिटासाठी थांबला होता.

झाले असे की, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमजवळ वाळलेले गवत जाळण्यात आले होते. त्यावेळी वाऱ्याची दिशा स्टेडियमच्या बाजूने असल्याने ती राख उडून मैदानात आली होती. खेळपट्टीच्या आजूबाजूलाही ही राख पसरली. त्यामुळे खेळाडू पुन्हा ड्रेसिंग रुममध्ये परतले. त्यानंतर मैदान स्वच्छ करण्यात आले आणि मग सामना पुन्हा सुरु झाला.

(Maharashtra vs Tamil Nadu ranji match stopped due to ashes are falling on the ground)

अश्विनची लक्षवेधक कमेंट

या घटनेबद्दल एका युजरने ट्वीट केले होते की 'आज या घटनेसह तमिळनाडू आणि महाराष्ट्र यांच्यातील तीव्र स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या मालिकेला आता 'द ऍशेस' म्हणून ओळखली जाईल.'

या युजरच्या ट्वीटला रिप्लाय देताना आर अश्विनने लिहिले की 'आजच्या दिवसातील सर्वोत्तम ट्वीट'.

खरंतर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका खेळली जाते, त्या मालिकेला ऍशेस म्हणून ओळखली जाते. ऍशेस हा इंग्लिश शब्द असून त्याचा अर्थ राख असा होतो.

महाराष्ट्राने घेतली आघाडी

या सामन्यात महाराष्ट्राने पहिल्या डावात आघाडी घेतली. महाराष्ट्राने पहिल्या डावात ९८ षटकात सर्वबाद ४४६ धावा केल्या. महाराष्ट्राकडून ऋतुराज गायकवाडने १९५ धावांची खेळी केली. तसेच अझिम काझीने ८८ आणि केदार जाधवने ५६ धावांची अर्धशतकी खेळी केली. तमिळनाडूकडून संदीप वॉरियरने ३ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर तमिळनाडूने ११८.५ षटकात सर्वबाद ४०४ धावा केल्या. त्यामुळे महाराष्ट्राने ४२ धावांची आघाडी घेतली. तमिळनाडूकडून विजय शंकरने शतकी खेळी करताना १०७ धावा केल्या. तसेच प्रदोष पॉल ८४ आणि एन जगदिशनने ७७ धावांची अर्धशतकी खेळी केली. महाराष्ट्राकडून प्रदीप दधे आणि राजवर्धन हंगारगेकर यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

दुसऱ्या डावात महाराष्ट्राने तिसऱ्या दिवसाखेर २६ षटकात ३ बाद १०४ धावा केल्या आहेत. राहुल त्रिपाठीने ६१ धावांची अर्धशतकी खेळी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT