Ranji Trophy: अरुण कार्तिकसमोर गोव्याचे नमते; पुदुचेरीस 76 धावांची आघाडी

दर्शन वगळता गोव्याचे बाकी गोलंदाज निष्प्रभ
Ranji Trophy | Arun Kartik
Ranji Trophy | Arun Kartik Dainik Gomantak
Published on
Updated on

Ranji Trophy Goa vs Puducherry: गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ याने चिवट प्रयत्नाद्वारे सकाळच्या सत्रात झटपट विकेट टिपून पुदुचेरी संघाला कोंडीत पकडले, त्याने रणजी क्रिकेट कारकिर्दीत 100 गडी बाद करण्याचा पराक्रमही साधला. पण इतर गोलंदाज निष्प्रभ ठरले.

त्यांनी निर्दोष नाबाद शतकी केलेल्या के. बी. अरुण कार्तिक याच्यासमोर नमते घेतले. परिणामी पाहुण्या संघाने पहिल्या डावात दुसऱ्या दिवसअखेर 76 धावांची आघाडी घेत प्रतिस्पर्ध्यांना बॅकफूटवर ढकलले.

पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर बुधवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्याच चेंडूवर गोव्याच्या लक्षय गर्ग याने विकेट मिळविली. त्यानंतर डावखुरा फिरकी गोलंदाज दर्शन याने 16 धावांच्या अंतरात तिघा फलंदाजांना बाद केले. त्यामुळे उपाहारापूर्वीच पुदुचेरीचा डाव 4 बाद 64 असा संकटात सापडला.

नंतर दर्शनने आणखी एक गडी बाद केल्यामुळे पुदुचेरीची 5 बाद 114 अशी स्थिती झाली. गोव्याला मोठी आघाडी खुणावू लागली. मात्र 36 वर्षीय अरुण कार्तिकच्या मनात वेगळेच होते. त्याला पुदुचेरीतर्फे पहिलाच मोसम खेळणारा मध्य प्रदेशचा अंकित शर्मा याची खंबीर साथ मिळाली.

Ranji Trophy | Arun Kartik
CK Nayudu Trophy: गोव्याच्या कश्यप बखलेची वडिलांना ‘शतकी’ आदरांजली

उपाहारानंतर उजव्या-डावखुऱ्या जोडीने गोव्याच्या गोलंदाजांना दाद दिली नाही. त्यांनी सहाव्या विकेटसाठी 143 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्यामुळे सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर पुदुचेरीस गोव्याच्या पहिल्या डावातील 223 धावांना 6 बाद 299 असे चोख प्रत्युत्तर देता आले.

गोव्याच्या ऋत्विक नाईकने दिवसाचा खेळ संपण्याच्या मार्गावर असताना अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीवर कृष्णा पांडे याचा फाईन लेगला सोपा झेल सोडला, त्यामुळे त्याची अरुण कार्तिकसोबतची सातव्या विकेटसाठी 42 धावांची आघाडी अभेद्य राहिली व गोव्याच्या जखमेवर आणखीनच मीठ चोळले गेले.

सलग दुसरे शतक

अरुण कार्तिक हा मूळचा तमिळनाडूचा यष्टिरक्षक-फलंदाज. घरच्या संघात स्थान मिळत नसल्याने तो पुदुचेरी संघात दाखल झाला. सेनादलाविरुद्ध त्याने मागील लढतीत अनुक्रमे 58 व 130 धावा केल्या होत्या. हाच फॉर्म या 36 वर्षीय फलंदाजाने पर्वरीतही कायम राखला. तो भक्कमपणे खेळला.

गोव्याचे गोलंदाज त्याची परीक्षा घेऊ शकले नाहीत. जबाबदारीने खेळताना 79 वरून शतकी वेस गाठताना त्याने एकही चौकार मारला नाही. एकंदरीत त्याने 11 वे प्रथम श्रेणी, तर पुदुचेरीतर्फे तिसरे रणजी शतक नोंदविले. दिवसअखेर तो 113 धावांवर खेळत होता. त्याने 180 चेंडूंचा सामना करताना नऊ चौकार मारले.

Ranji Trophy | Arun Kartik
India vs Sri Lanka: दुसऱ्या वनडेत सूर्याला संधी? 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI

अंकितला ‘नो-बॉल’ जीवदान

डावखुरा अंकित शर्मा वैयक्तिक 26 धावांवर असताना ऑफस्पिनर मोहित रेडकरच्या चेंडूवर त्याचा फटका चुकला व स्नेहल कवठणकरने कव्हर्समध्ये झेल टिपला. यावेळी पुदुचेरीची 5 बाद 166 अशी स्थिती होती. पंच वृंदा राठी यांनी वैधता तपासण्यासाठी ‘रेफरल’ची मदत घेतली व मोहितचा पाय क्रीझबाहेर गेल्याचे निदान झाले.

‘नो-बॉल’वरील जीवदानाचा पुरेपूर लाभ उठवत अंकितने कारकिर्दीतील 11 वे प्रथम श्रेणी अर्धशतक नोंदविले आणि चहापानापूर्वीच अरुण कार्तिकसमवेत पुदुचेरीला गोव्याची धावसंख्या पार करून दिली. अखेरीस सिद्धेश लाडने त्याच्या यष्टीचा वेध घेतला. या 31 वर्षीय खेळाडूने 138 चेंडूंत 10 चौकार व एका षटकाराच्या मदतीने 78 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः 223.

पुदुचेरी, पहिला डाव (बिनबाद 17 वरून) ः 89 षटकांत 6 बाद 299 (नेयान कंगायान 37, के. अरविंद 4, जी. चिरंजीवी 7, पारस डोग्रा 12, के. बी. अरुण कार्तिक नाबाद 113, डी. रोहित 19, अंकित शर्मा 78, कृष्णा पांडे नाबाद 21, लक्षय गर्ग 14-1-47-1, अर्जुन तेंडुलकर 15-3-51-0, दर्शन मिसाळ 34-7-88-4, ऋत्विक नाईक 5-1-20-0, मोहित रेडकर 15-0-70-0, सिद्धेश लाड 6-0-18-1).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com