Syed Mushtaq Ali Trophy T20 Dainik Gomantak
क्रीडा

Syed Mushtaq Ali Trophy T20 स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ गोव्याला भारी !

सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 (Syed Mushtaq Ali Trophy T20) क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी महाराष्ट्राने (Maharashtra) गोव्यास (Goa) 73 धावांनी सहजपणे हरविले.

दैनिक गोमन्तक

पणजी: नाबाद शतकवीर यश नहार (Yash Nahar) व कर्णधार ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad) यांच्या झंझावाती शतकी सलामीच्या बळावर सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी महाराष्ट्राने (Maharashtra) गोव्यास (Goa) 73 धावांनी सहजपणे हरविले. लखनौ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) एकाना स्टेडियमवर एलिट अ गट सामना झाला.

महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 3 बाद 177 धावा केल्या. यश नहार याने कारकिर्दीतील पहिले टी-20 शतक नोंदविताना अवघ्या 68 चेंडूंत नाबाद 103 धावा केल्या. त्याने सहा चौकार व पाच षटकार मारले. यशने ऋतुराजसमवेत पहिल्या विकेटसाठी 12.4 षटकांत 104 धावांची सलामी दिली. ऋतुराजने 34 चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने 44 धावा केल्या.

महाराष्ट्राने दिलेले कठीण आव्हान गोव्याला अजिबात पेलवले नाही. त्यांचा डाव 18.1 षटकांत 104 धावांत आटोपला. महाराष्ट्राचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव याने तीन गडी टिपले, त्यामुळे गोव्याची 5 बाद 64 अशी घसरगुंडी उडाली, तेथून गोव्याला सावरताच आले नाही. शुभम रांजणे याने सर्वाधिक 35 धावा केल्या. त्याने 30 चेंडूंतील खेळीत चार चौकार व एक षटकार मारला. स्पर्धेतील पहिलाच सामना खेळणाऱ्या स्नेहल कवठणकरने 22 धावा केल्या. स्नेहल-शुभम जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली. गोव्याचा कर्णधार एकनाथ केरकर सलग दुसऱ्या डावात शून्यावर बाद झाला. गोव्याने काल तमिळनाडूस पराभवाचा धक्का दिला होता, आज त्यांना अष्टपैलू महाराष्ट्राचे आव्हान अजिबात झेपले नाही.

तमिळनाडू, महाराष्ट्र बाद फेरीत

तमिळनाडू व महाराष्ट्राने स्पर्धेत पाचपैकी चार सामने जिंकून प्रत्येकी 16 गुणांसह बाद फेरी गाठली. पंजाबचे तीन विजय व दोन पराभव या कामगिरीसह 12 गुण झाले. गोव्याने दोन विजय व तीन पराभवासह आठ गुणांची कमाई केली. पुदुचेरी व ओडिशाचे प्रत्येकी चार गुण झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT