पणजी ः पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर. सोबत पथक प्रमुख स्मिता शिरोळे-यादव, महाराष्ट्राचे क्रीडा उपसचिव श्री. हांजे, संघटनेचे खजिनदार धनंजय भोसले.  Dainik Gomantak
क्रीडा

National Games 2023: उत्तराखंड मध्ये होणाऱ्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतही दबदबा राखण्याचे महाराष्ट्राचे ‘मिशन’

महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर; 200 पदकांकडे कूच

किशोर पेटकर

National Games Goa 2023: गोव्यात सध्या सुरू असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पदकतक्त्यात अव्वल स्थान मिळवत महाराष्ट्राने द्विशतकी पदकांच्या दिशेने कूच केली आहे.

या कामगिरीने प्रेरित होऊन महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेने महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आतापासूनच पुढील स्पर्धेसाठी ‘मिशन उत्तराखंड’ मोहीम हाती घेतली असून त्यादृष्टीने आराखडा तयार होत आहे, अशी माहिती संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

गोव्यातील स्पर्धेत महाराष्ट्राने सेनादलास मागे टाकून अव्वल क्रमांक मिळविला आहे. त्यांनी 180 पेक्षा जास्त पदकांची कमाई केली असून लवकरच द्विशतक पार होण्याचे संकेत आहेत. गोव्यानंतर पुढील वर्षी उत्तराखंड राज्यात 38 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा नियोजित आहे.

त्या स्पर्धेतही सर्वाधिक पदकांसाठी महाराष्ट्र दावेदार राहील असा विश्वास शिरगावकर यांनी व्यक्त केला. ‘‘पुढील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा उत्तराखंडमध्ये होत आहे. त्या स्पर्धेसाठी आम्ही आतापासून तयारी सुरू केली आहे. पदकप्राप्तीसाठीचा साठ टक्के आराखडा तयार आहे.

केवळ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाच नव्हे, तर ऑलिंपिक स्पर्धांतही महाराष्ट्राच्या खेळाडूंना जास्त पदके मिळावीत यासाठी आम्ही नियोजन करत आहोत. त्यात आम्ही यशस्वी ठरू याचा मला विश्वास वाटतो,’’ असे शिरगावकर म्हणाले.

पदकप्राप्तीचे लक्ष्य नजरेसमोर

शिरगावकर म्हणाले, की ‘‘गुजरातमधील गतवर्षीच्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला सेनादलानंतर पदकतक्त्यात दुसरा क्रमांक मिळाला. ती स्पर्धा संपली तेव्हाच आम्ही सेनादलास मागे टाकण्यासंदर्भात आराखडा तयार करण्यास सुरवात केली.

गोव्यातील स्पर्धा सुरू झाल्यानंतर पदकतक्त्यात अग्रस्थान आणि अधिकाधिक पदके जिंकण्याचे लक्ष्य नजरेसमोर ठेवूनच महाराष्ट्राचे खेळाडू मैदानात उतरले. मॉडर्न पेंटॅथलॉन, पेंचाक सिलाट, मल्लखांब, जिम्नॅस्टिक्स, जलतरण आदी खेळांत सर्वाधिक पदके आम्हाला मिळाली.

आता योगासन, खो-खो, कबड्डी या खेळातही महाराष्ट्रालाच जास्त पदके मिळविण्याची संधी आहे. पदकांचे द्विशतक निश्चितच पार होईल.’’

मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेचे फळ

शिरगाव यांनी सांगितले, की ‘‘महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात मिनी ऑलिंपिक स्पर्धा घेण्यात आली. मध्यंतरी खंडित झालेली ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर खेळाडूंत उत्साह संचरला.

त्याचा फायदाही गोव्यातील स्पर्धेत खेळताना झाला. गुणवान नवोदित खेळाडू गवसले. मिनी ऑलिंपिक स्पर्धेतील प्रतिभाशाली खेळाडूंना चांगले प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात आला.

गोव्यातील स्पर्धेत जास्त पदके मिळण्याचे श्रेय राज्य मिनी ऑलिंपिक स्पर्धेला देता येईल. महाराष्ट्राच्या यशात ग्रामीण भागातील खेळाडूंचा मोलाचा वाटा आहे.’’

‘‘महाराष्ट्राला आतापर्यंत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकतक्त्यात एवढी मोठी मजल मारता आली नव्हती. योग्य खेळाडूंची निवड, त्यांना उपयुक्त मार्गदर्शन, सुविधा आणि सवलती पुरविण्याचे धोरण राबविण्यात आले. त्यामुळे आम्हाला गोव्यात विक्रमी यश लाभले आहे.’’

- नामदेव शिरगावकर, सचिव महाराष्ट्र ऑलिंपिक संघटना

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: राष्ट्रीय महामार्ग अनमोड येथे खचल्याने अनमोड घाटावरुन जाण्यास अवजड वाहनांना प्रवेश बंद

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Shani Budh Vakri: शनि-बुध ग्रहांचा राशीबदल 'या' तीन राशींसाठी भाग्यकारक; धनलाभ ते प्रेमविवाहापर्यंत संधींचे दार उघडणार

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

SCROLL FOR NEXT