Uttar Pradesh Police

 

Dainik Gomantak 

क्रीडा

IPL 2022: लखनऊ टीमला यूपी पोलिसांनी दिला इशारा

दैनिक गोमन्तक

देशात कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट धुमाकूळ घालत असल्यामुळे पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. याच पाश्वभूमीवर 2022 इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) सीझनचे भवितव्यही अजूनही संभ्रमात आहे. मात्र, दरम्यानच्या काळात नवीन आयपीएल फ्रँचायझी सक्रिय होऊ लागल्या आहेत. आरपी संजीव गोएंका ग्रुपच्या मालकीच्या लखनऊच्या टीमने (lucknow Team) ट्विटरवर पदार्पण केले आहे. मात्र, ग्रुपने रायझिंग पुणे सुपरजायंटचे ट्विटर अकाउंट बदलून टीम लखनऊ आयपीएल केले आहे. या डिजिटल डेब्यूवर उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) पोलिसांनी ट्विट करुन टीमला इशारा दिला आहे.

दरम्यान, 3 जानेवारी रोजी लखनऊच्या आयपीएल टीमचे ट्विटर अकाऊंट सक्रिय झाले. त्यातच 4 जानेवारीच्या रात्री उशिरा यूपी पोलिसांनी (Uttar Pradesh Police) इशारा दिला आहे. लखनौ फ्रँचायझीने "स्वागत नहीं करोगे हमारा" असे ट्विट केले होते, त्यासोबतच हे लखनऊच्या आयपीएल संघाचे अधिकृत ट्विटर हँडल असल्याची माहितीही देण्यात आली होती. यावर, यूपी पोलिसांनीही रिट्विट केले आणि लखनऊ फ्रँचायझीचे डिजिटल पदार्पण करताना स्वागत केले.

यूपी पोलिसांनी ट्वीटमध्ये म्हटले, "डिजिटल डेब्यूवर टीम लखनऊ आयपीएलमध्ये तुमचे स्वागत आहे. कोरोना काळात आपण प्रत्येकाने आपली जबाबदारी दाखवायची असल्याचे यूपी पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आयपीएलच्या या नव्या मोसमात लखनौशिवाय अहमदाबादचा संघही दिसणार आहे. या दोन्ही संघांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच आयपीएल आणि या स्पर्धेच्या आयोजकांकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT