Lucknow Supergiants' Romario Shepherd was added to their squad by Mumbai Indians in the player trading window. Dainik Gomantak
क्रीडा

ट्रेडिंग विंडोचा Mumbai Indians कडून श्रीगणेशा; लिलावाआधीच LSG चा ऑलराउंडर पलटनच्या ताफ्यात

Ashutosh Masgaunde

Lucknow Supergiants' Romario Shepherd was added to their squad by Mumbai Indians in the player trading window:

आयपीएलच्या पुढील मोसमासाठी मुंबई इंडियन्सने जोरदार तयारी सुरू केली आहे. पुढच्या महिन्यात होणाऱ्या लिलावापूर्वी त्याने लखनौ सुपरजायंट्सच्या रोमारियो शेफर्डवर प्लेअर ट्रेडिंग विंडोमध्ये विश्वास व्यक्त केला आहे.

पाच वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई संघाने ट्रेडच्या माध्यमातून रोमारियोचा आपल्या संघात समावेश केला. त्याला लखनौ सुपर जायंट्सने गेल्या लिलावात 50 लाख रुपयांना विकत घेतले होते.

आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी, ट्रेडिंग विंडोद्वारे खेळाडू लिलावबद्ध करणारा मुंबई इंडियन्स हा पहिला संघ ठरला आहे.

मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील रोमारियोचा तिसरा संघ असेल. त्याने यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने चार आयपीएल सामन्यात तीन विकेट घेतल्या आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या आगामी हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंबर रोजी होऊ शकतो.

यावेळी लिलाव दुबईत होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास आयपीएलच्या इतिहासात प्रथमच खेळाडूंचा विदेशात लिलाव होईल.

त्याच वेळी, महिला प्रीमियर लीगचा लिलाव 9 डिसेंबर रोजी होणे अपेक्षित आहे. यासंदर्भात बीसीसीआयने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

ईएसपीएन-क्रिकइन्फोच्या मते, खेळाडूंना संघात कायम ठेवण्यासाठी आणि करारमुक्त करण्यासाठी फ्रेंचायझींकडे १५ नोव्हेंबरपर्यंत वेळ आहे. त्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवलेल्या खेळाडूंची अंतिम यादी सादर करावी लागणार आहे.

यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लिलावासाठी खेळाडूंचा पूल तयार केला जाईल. आगामी लिलावादरम्यान प्रत्येक संघाकडे 100 कोटी रुपयांची पर्स असेल. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम पाच कोटी रुपये अधिक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

Sunburn Festival 2024: सनबर्नविरोधात कामुर्लीत स्थानिकांचा कडक विरोध; उद्याची बैठक ठरणार निर्णायक!

Mhadei Water Dispute: ...कर्नाटकाविरोधात लढण्यास सावंत सरकार ठरले कुचकामी; आलेमाव यांचा घणाघात

SCROLL FOR NEXT