Lovlina Borgohain Dainik Gomantak
क्रीडा

World Boxing Championships: निखत पाठोपाठ लवलिनाही जिंकली 'गोल्ड'! भारतासाठी स्पर्धेत चौथे 'सुवर्णयश'

Pranali Kodre

Lovlina Borgohain clinching Gold Medal: भारताची स्टार बॉक्सर लवलिया बॉर्गोहेन हिने रविवारी जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत भारतासाठी विक्रमी सुवर्णपदक जिंकले आहे. तिने 75 किलो वजनी गटात खेळताना अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या कॅटलिन ऍने पार्कर हिला 5-2 अशा फरकाने पराभूत केले.

नवी दिल्लीत झालेल्या या सामन्यात लवलिना आणि पार्कर यांच्यात चांगलीच चूरस पाहायला मिळाली होती. पहिली फेरी लवलिना जिंकली होती. पण दुसऱ्या फेरीत पार्करने चांगले पुनरागमन केले आणि ही फेरीही जिंकली. दरम्यान तिसऱ्या फेरीत लवलिनाने विजय मिळवण्यात यश मिळवले.

लवलिनासाठी जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत पहिले सुवर्णपदक ठरले आहे. तिने यापूर्वी 2018 आणि 2019 साली जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते.

दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या लवलिनासाठी 2022 वर्षे फारसे खास ठरले नव्हते. पण नंतर तिने एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक जिंकून चांगले पुनरागमन केले आणि आता जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्येही सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

लवलिनापूर्वी जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत रविवारीच निखत झरिनने 50 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे. तिने व्हिएतनामच्या एनगुयेन थी टॅम हिला 5-0 अशा फरकाने पराभूत केले आणि सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.

महत्त्वाचे म्हणजे याच स्पर्धेत शनिवारी नीतू घंघास आणि स्विटी बुरा यांनीही सुवर्णपदक जिंकले आहे. नीतूने 48 किलो वजनी गटात आणि स्विटीने 81 किलो वजनी गटात ही सुवर्ण पदक जिंकले.

त्यामुळे जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत यावर्षी भारताने तब्बल चार सुवर्णपदकांची कमाई केली आहे. त्यामुळे ही 2006 नंतर भारताचे जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT